एसटी कर्मचारी संघटनेचे 13 फेब्रुवारीला अधिवेशन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

कोल्हापूर - महाराष्ट्र मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटनेचे 56 वे राज्यव्यापी अधिवेशन येत्या 13 व 14 फेब्रुवारीला कोल्हापूरात होत आहे. माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तपोवन मैदानावर हे अधिवेशन होईल. राज्यभरातील एसटी कर्मचारी अधिवेशनाला येतील. अशी माहिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष उत्तम पाटील व स्वागताध्यक्ष वसंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

हे पण वाचा - या शेतकऱ्यांसारखा प्रयोग कराल तर व्हाल मालामाल....

या अधिवेशनाला पालकमंत्री सतेज पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य व कुटूंब कल्यान मंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर आदी उपस्थित रहाणार आहेत. संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघटना नेते हनुमंत ताटे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशन होत आहे. 

हे पण वाचा - नशेत बरळला अन्‌ खुनाला फुटली वाचा 

या अधिवेशनात एसटी महामंडळाचा राज्य शासनाच्या सेवेत समावेश करावा. एसटी कर्मचाऱ्यांसाठी एकतर्फी लागू केलेली शिस्त व अपिल कार्य पध्दत रद्द करावी, मागील काळात लागू केलेली अन्यायकारक परिपत्रके रद्द करावीत, एसटीचे खासगीकरण व कंत्राटीकरण रद्द करावे, भाडेतत्वावर घेतलेल्या शिवशाही गाड्यांची सेवा बंद करावी, कामगारांचे प्रलंबीत अर्थिक लाभ वेळेवर द्यावेत, एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश व शिलाई भत्ता द्यावा तसेच चालक तथा वाहक अशी महामंडळाच्या सेवेत आणलेली नवी संकल्पना रद्द करावी आदी मागण्या संदर्भात या अधिवेशनात चर्चा होणार आहे. असेही वसंत पाटील यांनी सांगितले. 

शासकीय सेवेची प्रमुख मागणी 
सार्वजनिक प्रवासी वाहतूक क्षेत्रात सर्वोत्तम सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाला खासगी वाहतूकीचे मोठे आवाहन आहे. एसटीचा महसुल कमी होत आहे. कर्मचाऱ्यांना वेतन देण्यातही अडचणी येत आहेत. अशात गेल्या पाच वर्षात अनेक खासगीकंत्राटे देण्यात आली. यातून कोठ्यावधी रूपयांचा खर्च वाढला. तसेच एसटीच्या खासगीकरणाची चर्चा सुरू झाली अशा स्थितीत एसटी कर्मचारी धास्तावले आहेत. यापार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाचे शासकीय सेवेत समावेश करावा अशी मागणी या अधिवेशनात केली जाणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Staff Association convenes on 13 February in kolhapur