Kolhapur CPR Fire : आता डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

staff of CPR hospital to learn a disaster management for all officers and doctors also disaster management also work on it in kolhapur
staff of CPR hospital to learn a disaster management for all officers and doctors also disaster management also work on it in kolhapur

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यानंतर येथील वॉर्डबॉय, सेविका, डॉक्‍टरांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून नियोजन सुरू आहे.

काल सकाळी सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरला शॉर्ट सर्किटने आग लागली, अशा परिस्थितीत तिथे असणाऱ्या वॉर्डबॉय, कर्मचारी, सेविकांसह डॉक्‍टरांना आलेल्या आपत्तीचा सामना कसा करावा?, याचे धडे दिले जाणार आहेत. सीपीआरसारख्या गजबजलेल्या दवाखान्यात आज अचानक आग लागली. प्रसंगावधान राखत ही आग आटोक्‍यात आणली. पण भविष्यात सीपीआरमध्ये असा प्रसंग ओढवला तर वॉर्डबॉय, सेविकांसह इतर डॉक्‍टरांनी काय करावे?, याचे धडे दिले जाणार आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून यासाठी नियोजन केले जात आहे. सध्या कोरोनामुळे सीपीआर रुग्णालय रुग्णांनी फुल्ल आहे. नवीन रुग्णांची दररोज भर पडत आहे. अशातच आगीचेही संकट समोर होते. त्यामुळे सीपीआरसह जिल्हा प्रशासनाकडूनही तातडीने हालचाल केली. यावेळी, महानगरपालिकेने दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याचे लक्षात आले. पण अशा परिस्थिती गोरगरीब लोकांना विनाकारण जीव गमवावा लागू नये, यासाठी तातडीची खबरदारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थान ठोस नियोजन करत आहे.
 

याचे होणार नियोजन

- संपूर्ण सीपीआर इमारतीचे आपत्ती व्यवस्थापन आराखडा
- आपत्ती व्यवस्थापनासाठी वेळोवेळी मॉकड्रिल घेतले         जातील
- सुरक्षा लेखापरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या जातील

"सीपीआरमध्ये घडलेला प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी नियोजन सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य ती उपाययोजना केली जाईल. सध्या संपूर्ण सीपीआरचे आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे काम आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जातील. मॉकड्रिलही केले जाईल."

- प्रसाद संकपाळ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com