कृषी आणि कामगार कायद्या विरोधात उभे राहा : पालकमंत्री सतेज पाटील 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी, तसेच शहर पातळीवर हे आंदोलन करण्यात येणार आहे.

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी आणि कामगार कायद्या विरोधात 2 ऑक्‍टोंबरचे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात आज बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. 

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी, तसेच शहर पातळीवर हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच बरोबर नवीन कृषी कायद्या विरोधात 5 लाख सह्यांचे लक्ष पूर्ण करा अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी दोन ऑक्‍टोंबर रोजी करण्यात येणाऱ्या आंदोलना संदर्भात मार्गदर्शनही केले. केंद्र सरकार नवनवीन कायदे आणून शेतकरी आणि कामगारांचे कंबरडे मोडण्याच काम करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मोठ्या संख्येने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले. 

हे पण वाचा -  आता चुकीला माफी नाही ; कोल्हापुरच्या नव्या पोलीस अधीक्षकांचा सज्जड इशारा 

यावेळी आमदार राजू आवळे, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक शशांक बावचकर, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, संध्या घोटणे, प्रदेश प्रतिनिधी सुरेश कुराडे, जिल्हा सचिव संजय पवार-वाईकर, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, नगरसेवक राहुल खंजिरे, बाजार समिती संचालक सचिन घोरपडे, शंकरराव पाटील,शिवाजी कांबळे, जयसिंगराव हिर्डेकर, हिंदुराव चौगले, इनामदार, जाधव, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, संपतराव चव्हाण, किशोर खानविलकर, उज्वला चौगले, मंगल खुडे, लीला धुमाळ, विद्या घोरपडे,वैशाली महाडिक, हेमलता माने, वैशाली पाडेकर, साखरे, सुजित देसाई,ए.डी.गजगेश्वर, यशवंत थोरवत,आर. के. देवणे,नारायण लोहार,आकाश शेलार, तानाजी लांडगे, रणजित पोवार यांच्यासह जिल्ह्यातील कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.  

 संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stand up against agriculture and labor laws say Guardian Minister Satej Patil