काय सांगताय ! चक्क आपल्या 'लाल परीत' वाहिले जात आहेत 'हे' दगड...

राजू पाटील
मंगळवार, 30 जून 2020

देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे आज दुपारी ही एसटी भरली आणि सायंकाळी तिथून बाहेर पडली.

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) - राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मालवाहतुकीसाठी पुढे आणल्या आहेत.त्यासाठी या लाल परींची तशी रचना ही करुन घेतली आहे. याचाच पहिला टप्पा म्हणजे देवगडहुन चिरा (लाल दगड) भरून एसटी ठिकपुर्ली (ता.राधानगरी) येऊ लागली आहे. आजवर ट्रक मधून चिरे आणलेले अनेकांनी पाहिले मात्र एसटीतून चिरे येतात ही कल्पनाच लोकांना हास्यास्पद ठरू लागली आहे.

कोरोनामुळे एसटी परिवहन महामंडळ अडचणीत आहे. या रोगांच्या भीतीने प्रवासीही एसटीत बसत नसल्याने चालक-वाहकांना भुर्दंड या महामंडळावर बसत आहे. यावर पर्याय म्हणून राज्य शासनाने मालवाहतुकीसाठी बसेसचा वापर सुरू केला आहे. ही संधी पकडून ठिकपुर्ली येथील अनिल चौगले यांनी चिऱ्याच्या एसटीची याची मागणी केली. देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे आज दुपारी ही एसटी भरली आणि सायंकाळी तिथून बाहेर पडली. आज रात्री आठ वाजता फोंडा येथे या गाडीची आगमन झाले असून पहाटे चिरा भरलेली गाडी येथे पोहोचणार आहे.

वाचा सविस्तर - लॉक डाउनच्या काळात जोतिबा भक्ताने लिहले 'छबिना' हे पुस्तक....

वाळू- चिऱ्यासाठी वाहतुकीला ट्रक पाहिले मात्र एसटीतून चिरा येतोय ही कल्पना लोकांना विचित्र वाटत असून आता हाही लोकांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनणार आहे. चिरा भरलेल्या एसटी ची पहिली खेप राधानगरी तालुक्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state government has introduced State Transport Corporation buses for freight kolhapur