...'त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात कोल्हापूर जिल्हा यशस्वी' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते. मित्तल यांनी कोविडबाबत सद्यःस्थितीची माहिती दिली.

कोल्हापूर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापुरातील तिन्ही मंत्र्यांसह प्रशासन विशेषत: पोलिस, आरोग्य, महसूल या सर्वांनी युनिक पॅटर्न राबवून प्रभावीपणे काम केले. नियोजनामुळे संसर्ग रोखण्यात जिल्हा यशस्वी ठरला आहे. यापुढेही असेच चांगले काम करा, अशा सूचना गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी आज दिल्या.

शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात देसाई यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गृह, वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या विभागांची आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते. मित्तल यांनी कोविडबाबत सद्यःस्थितीची माहिती दिली. जिल्हाधिकारी देसाई यांनी या १८ प्रवेश नाक्‍यांवरून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या तपासणीबाबतची माहिती दिली. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी अहवालाबाबतही त्यांनी माहिती दिली. डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि कोरोनातील कामकाजाबाबत सादरीकरण केले. 

मंत्री देसाई म्हणाले, ‘‘पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही कोरोना रोखण्यासाठी प्रभावीपणे काम केले आहे. प्रशासनाने युनिक पॅटर्न राबवून कोरोनाचा संसर्ग रोखला आहे. ‘चोवीस बाय सात’ फिल्डवर राहून परिस्थिती हाताळली. पोलिस, महसूल, आरोग्य यांच्यावर अधिक जबाबदारी होती. या सर्वांचे आभार मानून देसाई यांनी सांगली जिल्ह्यातही पालकमंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह प्रशासनाने चांगले काम केले आहे, असे सांगितले.

हे पण वाचा - ब्रेकिंग ; रूग्णालयातून पळ काढलेल्या त्या कोरोना रूग्णाचा मृत्यू

 

विनापास प्रवेश नको 
जिल्ह्यामध्ये विनापास कोणीही येणार नाही, याची दक्षता यापुढील काळात घ्यावी. पणन, उत्पादन शुल्क, वस्तू व सेवा कर विभाग यांनीही अधिक काम करून महसूल वाढवावा. लोकाभिमुख आणि स्वच्छ प्रशासन राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे. यापुढेही आपण सर्व चांगले काम कराल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state home minister Shambhuraj Desai speech in kolhapur