करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आजची ओमकाररूपिणी रूपात पूजा

Todays worship of Ambabai in the form of Omkar
Todays worship of Ambabai in the form of Omkar

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ओमकाररूपिणी रूपात पूजा बांधण्यात आली. उद्या (बुधवारी) ललिता पंचमीचा सोहळा मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत होणार असून त्याच्या तयारीला प्रारंभ झाला आहे. 

मार्कंडेय ऋषी आणि नारद मुनी यांच्या संवादातून सनतकुमारांनी  श्री अंबाबाईचे सहस्रनाम उद्‌धृत केले आहे. सनतकुमार योगिजनांना श्री अंबाबाईची हजार नावे सांगतात आणि तिची स्तुती करतात, असे या पूजेचे महात्म्य असल्याचे श्रीपूजक माधव मुनीश्‍वर, मकरंद मुनीश्‍वर यांनी सांगितले. 


दरम्यान, येथील प्रसिद्ध रंगावलीकार महेश पोतदार यांनी यंदा रांगोळीतून अनोखे दुर्गादर्शन घडवले आहे. अंबाबाई मंदिरात ते रोज एक रांगोळी साकारत असून श्री शैलपुत्री, श्री ब्रह्मचारिणी, श्री चंद्रघंटा अशा रांगोळ्या त्यांनी पहिल्या तीन दिवसात साकारल्या.

आज कुष्मांडा रूपातील देवीचे दर्शन त्यांनी रांगोळीतून घडवले. स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री या रांगोळ्या ते येत्या काळात साकारणार आहेत. मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने श्री. पोतदार सोशल मीडियाच्या माध्यमातून रंगावलीचा हा आविष्कार सर्व भाविकांपर्यंत पोचवत आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com