लळीत सोहळा, देव जोतिबा आणि जोतिबा डोंगर 

निवास मोटे
Wednesday, 28 October 2020

देवाची गरू डारूढ अशी वैशिष्ट्ये पूर्ण अशी महापूजा बांधली जाते. मंदिर रात्रभर खूले असते.

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा जोतिबाच्या नवरात्र उत्सव सोहळ्याची सांगता लळीत सोहळ्याने होते. या निमित्त जोतिबा देवाची गरू डारूढ अशी वैशिष्ट्ये पूर्ण अशी महापूजा बांधली जाते. मंदिर रात्रभर खूले असते. मंदिरात भजन किर्तनाचा जागर होतो. 

या लळीत सोहळ्याचीआख्यायिका अशी,
 केदारनाथ देवांच्या अवतारातील मुकुटमणी व अलौकिक अवतार होय, इतकेच नव्हे तर पूर्णब्रम्हसनातन भाविकांना ज्या ज्या देवातील रूपामध्ये दर्शन मागितले किंवा विशिष्ट देवतेच्या दर्शनाची आस, इच्छा व्यक्त करताच देवाधिदेव केदारनाथांनी त्या त्या रुपात दर्शन देऊन भक्तांच्या इच्छा पूर्ण केल्या आणि भक्तवत्सल हे ब्रीद सार्थ केले.

नवरात्रामध्ये सुवर्णकमळयुक्त नवरात्र पूजेची इच्छा पूर्ण झाल्यानंतर कमळभैरव आश्विन शुद्ध द्वादशी ला केदारनाथांकडे जाऊन श्रींचे इच्छापूर्तीबद्द्ल आभार व्यक्त केले आणि हे ही सांगायला विसरला नाही की, हे देवा आज आश्विन शुद्ध द्वादशी आहे, आजच्या दिवशी आपण भक्तवत्सल हे ब्रीद सार्थ करण्यासाठी गजेंद्राचे प्राण वाचवण्यासाठी भगवान श्रीविष्णूचा धावा घेतला, त्यावेळी भगवान विष्णू निद्रेतून जागे होऊन अगदी मनाच्याही वेगाने मदतीसाठी धावले. महालक्ष्मीने विचारले सुद्धा एवढ्या तातडीने कुठं?  त्यावेळी क्षणाचाही विचार न करता लोळणारा पितांबर विस्कटलेले केस आणि अंगावरील वस्त्राची तमा न बाळगता गरुडारूढ होऊन हत्तीमधील हा उच्चार त्ती म्हणेपर्यंत आपण गजेंद्राजवळ पोहोचलात आणि गजेंद्राचा उद्धार केलात. तिथे गजेंद्राबरोबर नकरला सुध्दा प्रेमाने छातीशी धरून पुत्रवत प्रेमाने त्यांचा उद्धार केला.

करुणामय प्रेमाने भक्तांना चिंब करणारे आपले भक्तवत्सल रूप पाहिल्यानंतर आम्हाला ही कळे की देव भावाचा नाही तर भक्तांचासुद्धा तेवढाच भुकेला आहे. आपले हे प्रेमळ स्वरूप मात्र आपल्या समर्थ बाहुने छातीशी कवटाळणारे आहे. या विश्वनाथाचे रूप पाहताच माझेच काय या जगताचे नेत्र समाधानाने भरून आल्याशिवाय राहणार नाही.

हे पण वाचा - खासगी सावकारीतून हॉटेल व्यावसायिकावर चाकू हल्ला

हे जगतपालक देवा आपण ही सर्वमयी देवमूर्ती आहात हे स्मरून मी अगदी हृदयापासून एक वरदान मागतो आहे. मला ही ते भक्तवत्सल गरुडारूढ केवळ पिताच नव्हे तर मातृहृदय संपन्न करुणाकर श्री हरि विष्णूच्या रुपात मला दर्शन द्या आणि माझी इच्छा तृप्त करा आणि मी कृतकृत्य नव्हे तर शतशः धन्य होईल. म्हणून डोंगरावर लळीत सोहळा दरवर्षी होतो.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: story of jotiba lalit sohla