टेरेसवरच बहरली तोंडाला पाणी सुटेल अशी स्ट्रॉबेरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

अतिथंड हवेच्या ठिकाणी येणारी लालचुटूक स्ट्रॉबेरी कोल्हापूरातील एका इमारतीच्या टेरेसवर बहरली आहे. सासने कॉलनी येथील अमृता व सागर वासुदेवन यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. दोन तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर सेंद्रीय खतांवर स्ट्रॉबेरी पिकविण्याचे ध्येय त्यांनी साध्य केले आहे.

जरगनगर (कोल्हापूर) - अतिथंड हवेच्या ठिकाणी येणारी लालचुटूक स्ट्रॉबेरी कोल्हापूरातील एका इमारतीच्या टेरेसवर बहरली आहे. सासने कॉलनी येथील अमृता व सागर वासुदेवन यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. दोन तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर सेंद्रीय खतांवर स्ट्रॉबेरी पिकविण्याचे ध्येय त्यांनी साध्य केले आहे. या प्रयोगाबाबत स्ट्रॉबेरीप्रेमींना मार्गदर्शन करण्याचीही त्यांची तयारी आहे. 

हे पण वाचा - कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ... का...? 

दोन वर्षापूर्वी त्यांनी नर्सरीमधील स्ट्रॉबेरीची रोपे आणली. मोकळ्या जमिनीत तसेच थंड हवेच्या ठिकाणी येणारी स्ट्रॉबेरी त्यांनी हॅंगीग कुंड्यांमध्ये लावली. स्ट्रॉबेरी येण्यासाठी आर्द्रता गरजेची असते. बाष्पीभवन होऊ नये यासाठी मल्चिंगची गरज असते. या रोपांच्याच पानांचा वापर त्यांनी मल्चिंग म्हणून केला. आणि ग्रो बॅग्समध्ये लावलेल्या या रोपांना गेल्या वर्षी पहिला बहर आला. त्यावेळी लावलेल्या या दोन रोपांना दहा बारा स्ट्रॉबेरी लागल्या. उन्हाळ्यातही त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले. जीवामृत, पंचगव्य हे सेंद्रीय घटक रोपांना घातले. थोडेसे ऊन लागेल आणि आर्द्रताही राहिल, अशा ठिकाणी स्ट्रॉबेरीची रोपे ठेवली. उन्हाळ्यातही या रोपांना बहर आला आणि दोन तीन स्ट्रॉबेरी लागल्या. त्यांच्या या प्रयत्नानंतर या हिवाळ्यात आणखी स्ट्रॉबेरी लागतील, असा अंदाज त्यांना होताच. तरीही आणखी स्ट्रॉबेरी लागण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. यंदाही या रोपांना चांगला बहर आला आणि आता दुसऱ्यांदा फुले बहरली असून अजूनही, स्ट्रॉबेरी लागतील असा अंदाज आहे. 

हे पण वाचा - आता आपल्या तक्रारी सांगा थेट एसपींना; येथे घेतली जाईल तुमच्या तक्रारीची दखल 

प्रयत्नांना आले यश 
अतिथंड वातावरणात म्हणजेचे वाई, सातारा, महाबळेश्‍वर या ठिकाणी येणारी स्ट्रॉबेरी टेरेसवर फुलविण्याची जिद्द वासुदेवन पती पत्नींची होती. रोपलागवडीच्या पुस्तकांसह इंटरनेटद्वारेही त्यांनी माहिती संकलित केली. आपल्या टेरेसवरील बागेत नाविण्यपूर्ण प्रयोग ते करत असतात. असाच प्रयोग त्यांनी केला. टेरेसवर स्ट्रॉबेरी फुलवायची अशी जिद्दीनेच त्यांनी प्रयत्न केले आणि त्याला यशही आले. 

स्ट्रॉबेरीसाठी खुली जमीन, आर्द्रता गरजेची असते. माझ्या टेरेसवरचे वातावरण स्ट्रॉबेरीसाठी अनुकुल आहे, याची मला खात्री होती. ही रोपे ग्रो बॅग्समध्ये लावली. जेणेकरून पाण्याचा निचरा होईल. कंपोस्टयुक्त माती वापरली. थोडीशी काळजी घेतली. गेल्या वर्षीही स्ट्रॉबेरी लागल्या आणि यंदाही त्याचा बहर चांगला आहे. 
- अमृता वासुदेवन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: strawberry crop on terrace in kolhapur