15 गुंठ्यात पिकवले शेतकऱ्याने 34 पोती भात 

Success stories of sadoli dumala farmer bhikaji kambale
Success stories of sadoli dumala farmer bhikaji kambale

शिरोली दुमाला (कोल्हापूर) : सडोली दुमाला (ता. करवीर) शेतकरी दीपक भिकाजी कांबळे यांनी आधुनिक शेती तंत्राच्या साहाय्याने आपल्या 15 गुठ्यांत 34 पोती भात उत्पादन घेतले. 
दीपक ग्रामपंचायतमध्ये डेटा ऑपरेटरचे काम करतात. त्यांना शेतीची आवड असल्याने त्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करण्याचे ठरविले. 


भात लावण्यासाठी त्यांनी "शुभांगी' या संकरित बियाणाची निवड केली. रोटावेटरच्या साहाय्याने रानाची मशागत करत चार ट्रॉली शेणखत घातले व कुरीच्या साहाय्याने भाताची पेरणी केली. भात उगवून आल्यानंतर दोन वेळा भांगलण करून पिकाच्या वाढीसाठी 22 किलो युरिया खताचा वापर केला. तुडतुडे, भुंगा, खोडकिड नियंत्रणासाठी दोन वेळा औषध फवारणी केली. त्यामुळे भाताला लोंब्या चांगल्या पडल्या. यासाठी गावातील ज्योतिर्लिंग कृषी सेवा केंद्राचे रामदास साळोखे यांनी मार्गदर्शन केल्याचे दीपक कांबळे यांनी सांगितले.  

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com