पदवीधर तरूणांनी तयार केली ऊस टोळी 

Sugarcane troupe formed by graduate youth
Sugarcane troupe formed by graduate youth

नवेखेड - नवेखेड (ता. वाळवा) येथील पदवीधर तरुणांनी आपला स्वतःच्या शेतातील ऊस साखर करखान्यास घालण्यासाठी ऊस तोडणी टोळी तयार केली आहे. साखर कारखाने मजूर टंचाईने त्रस्त आहेत यावर या तरुणांनी उचललेले पाऊल आदर्शवत आहे.

सध्या ऊस तोडणीसाठी पुरेसे मजूर आलेले नाहीत. काही कारखान्यांनी गतवर्षी कोरोना महामारीची सुरवात झाली त्यावेळी मजुरांना पुरेसे सहकार्य केले नाही. दुष्काळी पट्ट्यात झालेला  दमदार पाऊस अशी अनेक कारणे आहेत. कारखान्यांनी तोडणी यंत्रे सुरू केली आहेत. परंतु अजूनही ओल असल्याने ती चालत नाहीत.

हुतात्मा कारखान्याने गतवर्षी नोव्हेंबर व डिसेंम्बरला तुटलेल्या आडसाली उसाचा खोडवा सध्या मालक तोडीने कारखान्यास पोच केल्यास तो स्वीकारला जाईल असा फतवा काढला आहे. कारखान्याकडे करार असणारे वाहन फक्त वाहतुकीसाठी वापरता येणार नाही अशी अट आहे. या अटीवर ऊस घालवायची अनेकांची तयारी आहे. परंतु ऊस तोडणार कोण? गावात ही मजुरांची मारामार. त्यात तोडणी भरणी हे काम कष्टाचे जोखमीचे. यावर पर्याय म्हणून नवेखेड मधील सात ते आठ तरुणांनी एकत्र येत ही ऊस तोडणीची टोळी केली आहे. 

टोळी माध्ये असणाऱ्या प्रत्येकाचे खोडवा उसाचे क्षेत्र आहे. ते त्यांनी तोडाण्यास सुरवात केली आहे. एक दोन सदस्यांचे क्षेत्र ही यांनी तोडणी करून संपवले आहे. या त्यांच्या उपक्रमामुळे जनावरांना चारा, स्वतःची मजुरी, लवकर रिकामे होणारे स्वतःचे क्षेत्र, असा दुहेरी फायदा होणार आहे.

चौकात गप्पा मारण्यापेक्षा तरुणांनी आधी केले मग सांगितले या पद्धतीने हे काम केले आहे. सज्जन चव्हाण, सत्यजित पाटोळे, सचिन जाधव, विनायक जाधव, कुमार गुंजवटे, सुहास चव्हाण, सुभाष पाटील हे तरुण यामध्ये सहभागी आहेत. यातील काही जण पदवीधर,तर काही जण अभियांत्रिकी, शुगरटेक्नॉलॉजीचे, काही दहावी बारावीचे शिक्षण घेतलेले तरुण आहेत.

या ऊस तोडणी टोळीच्या कामामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला आहे. आम्हीच पिकवू आम्हीच विकू, यावर विश्वास वाढला आहे. इतरांनी ही गप्प न बसता सक्रिय व्हावे 
-सत्यजित पाटोळे, ऊस तोडणी करणारा तरुण


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com