दिखावा करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न मनापासून सोडवा; खासदार सुप्रिया सुळे मोदी सरकारवर बरसल्या

नंदिनी नरेवाडी
Friday, 22 January 2021

शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना आंदोलकांशी पोलिसाकडून चांगली वागणूक मिळाली नाही.

कोल्हापूर: कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील विविध राज्यातून शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमाभागात एकवटले आहेत. सरकार त्यांच्या मागण्या मान्य करण्यापेक्षा दिखाव्यासाठी बैठकांवर बैठका घेत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर केला आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर केंद्र सरकार गंभीर नाही. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याची त्यांची इच्छा नाही, हे असंवेदनशील सरकार आहे,अशी टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शासकीय विश्रामगृहावर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्याच्या विरोधात शेतकरी गेली अनेक दिवस दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. या आंदोलकांशी पोलिस ज्या पध्दतीने वागले,ते अत्यंत चुकीचे आहे. शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना आंदोलकांशी पोलिसाकडून चांगली वागणूक मिळाली नाही. भाजपचे कांही कार्यकर्ते पक्ष सोडून आपल्याकडे येत आहेत,याबाबत विचारले असता

सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपमध्ये दडपशाहीचे धोरण आहे. या धोरणाला कंटाळून अनेकजण तो पक्ष सोडत आहेत. त्या पक्षात दडपशाही आहे, हे मला माहित आहे. त्यामुळे भविष्यातही अनेकजणांनी हा पक्ष सोडला तर आश्‍चर्य वाटायचे कारण नाही. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्याची सरकारची अजिबात इच्छा नाही. केवळ दिखावा करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. पण मनापासून प्रश्‍न सोडविले जात नाही. महाराष्ट्रावर तर केंद्राने अन्यायच केला आहे. अनेक प्रकारचा निधी केंद्राने अडकून ठेवला आहे. केंद्राने महाराष्ट्रावर अन्यायच केला आहे. 

हेही वाचा- राज्य शासनाचा निर्णय डावलून तेथे केंद्र शासनाने हस्तक्षेप करणे ही पद्धत योग्य नाही

सिरम इन्सिटीट्यूटमधील घटना दुदैवी 
सिरम इन्सिटीट्यूटमध्ये घडलेली घटना अत्यंत दुदैवी आहे. कांही लोकांचे यामध्ये प्राण गेले.त्यांना आपण वाचवू शकलो नाही,याची खंत वाटते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील हे तेथे गेले आहेत. नेमका काय प्रकार झाला आहे.हे आता लवकरच उघडकीस येईल.असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.  

 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supriya sule criticize bjp government kolhapur press conference political news marathi news