इचलकरंजीकरांनो चालाखी करायची नाय ; आता नजर ड्रोनची तुमच्यावर हाय ....

The surveillance will be monitored by a police system with a drone camera kolhapur marathi news
The surveillance will be monitored by a police system with a drone camera kolhapur marathi news

इचलकरंजी (कोल्हापूर) : इचलकरंजीत नाहक गर्दी करणाऱ्यांवर पोलिस यंत्रणेकडून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. गल्लीमध्ये एकत्र आल्यास अथवा एकत्रीत खेळत असल्याचे छायाचित्र पोलीसांना पाठविल्यास त्यावरून संबंधितांवर थेट पोलीस दप्तरी गुन्हा नोंद केला जाणार आहे. तसेच खोटे ओळखपत्र व स्टीकर्सचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास गंभीर गुन्हे नोंद करण्यात येणार आहेत.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कांही ठोस निर्णय घेण्यात आले असल्याची  माहिती पोलीस उप अधिक्षक गणेश बिरादार यांनी दिली. अत्यावश्यक सेवेचा पोलीस पास पाहिल्याशिवाय पेट्रोल दिल्यास पंप चालकांवर गुन्हा नोंद करून तो सील करण्याची इशारा देण्यात आला. अत्यावश्यक कामासाठी एकजणच घरातून पायी बाहेर पडा, असे  आवाहनही त्यांनी केले.

मदतीचा इव्हेंट करणाऱ्यांना इशारा

मदतीच्या हेतूने अनेकजण बाहेर पडत आहेत. पण पोलीस उप अधिक्षक कार्यालयाकडून परवानगी असल्याशिवाय मदत वाटप करता येत नाही. यातून कोरोना संसर्गाचा मोठा धोका आहे. त्यामुळे मदतीचा  इव्हेंट करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस कारवाई होवू शकतो. त्यामुळे परस्पर मदतीचे वाटप करू नये.

खोट्या पाणी वाटपाचा गंभीर प्रकार
 चारचाकीत पाण्याचे बॉक्स ठेवून त्याचे वाटप न करता नाहक शहरातील रस्त्यावरून फिरत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मदतीच्या बहाण्यांने अनेक नागरीक नाहक फिरत आहेत.  पोलिस यंत्रणा याबाबत गंभीर झाली आहे. रितसर नोंद न करता  मदत करायची असल्यास ती थेट पोलीस ठाण्याकडे जमा करता येणार आहे. 

बेघरांची सोय आधार केंद्रात

बेघर, भिकारी यांना मदत करण्यासाठी कांहीजण फिरत आहेत. पण त्यांच्या जेवणाची सोय शासनाकडून करण्यात आली आहे. बेघरांना पंचवटी टॉकीजजवळील बेघरांना पोलीस सोडत आहेत. भटक्या कुत्र्यांना बिस्कीट टाकण्यासाठी प्राणी मित्रांनी बाहेर पडू नये. परिसरातील नागरीकांनी घराबाहेर प्राण्यांना खाऊ टाकता येणार  आहे.

सुशिक्षीत लोकांचा अडाणीपणा
 
कांही सुशिक्षीत सकाळी व संध्याकाळी पाळीव कुत्र्याला घेवून फिरायला घराबाहेर पडत आहेत. यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे वेगळे पथक निर्माण केले आहे

दुचकींवर कारवाई

विनाकारण घराबाहेर पडत असलेल्या दुचाकींवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गेल्या पाच दिवसात १०९६ दुचाकींवर दंडात्मक कारवाई तर २७० दुचाकी जप्त करण्यात आल्याचे श्री. बिरादार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com