लॉकडाऊनच्या काळात वाहनांची काळजी कशी घ्याल?

How to take care of vehicles during knockdown
How to take care of vehicles during knockdown

उजळाईवाडी (कोल्हापूर) : संपूर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असल्यामुळे दीर्घ काळ वाहने एकाच जागी थांबण्याची शक्यता आहे. अशावेळी वाहनधारकांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरणा विषाणूचा संसर्ग कमी झाल्यानंतर आपल्या वाहनांकडून आपल्याला पूर्वीसारखाच आनंद घेता येईल. 

प्रत्येक तीन दिवसातून एकदा आपले वाहन थोडा वेळ चालू करून बंद करा. त्यामुळे बॅटरी ड्रेड होणार नाही व बॅटरीचे आयुष्य दीर्घकाळ राहील. दीर्घकाळासाठी गाडी एकाच ठिकाणी पार्क करावयाची असल्यास गाडीचा हँड ब्रेक लावून ठेवू नका. त्याऐवजी गाडी गिअरमध्ये किंवा पार्क मोडमध्ये पार्किंग करून ठेवा. शक्यतो आपली गाडी शेडमध्ये पार्किंग करावी अथवा गाडी कार बॉडी कव्हरने झाकावी. यामुळे गाडीवरती धूळ साचणार नाही व गाडीचा कलर शेड सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे बदलणार नाही. एकाच जागी कार दीर्घकाळ पार्किंग केल्यास टायर्स वरती फ्लॅट स्पॉट येतात हे टाळण्यासाठी आपली गाडी आठवड्यातून एकदा थोडी पुढे मागे करून चालवावी. शक्य असल्यास टायर्स मधील हवेचा दाब दर आठवड्याला तपासावा.

गाडी दीर्घकाळ एकाच ठिकाणी पार्क केल्यास साप, उंदीर यासारखे गाडीच्या वायरिंगला व व्यक्तीला अपाय करू  शकतात. अशावेळी  गाडीमध्ये थिमेट ठेवावे व प्रत्येक वेळी गाडीची योग्य तपासणी व निरीक्षण करूनच प्रवेश करावा. आपल्या कारच्या विमा नूतनीकरणाची समीप आली असेल तर आपण आता ऑनलाईन नूतनीकरण करू शकता.

लॉक डाऊनच्या काळात आपल्या वाहनांची अशा प्रकारे काळजी घेतल्यास वाहने सुस्थितीत राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com