sakal

बोलून बातमी शोधा

Suspicion of buying covid Purchase of Rs 47 crore Allegation of breach of notice

कोविड खरेदीवर संशयाचे धुके 

४७ कोटींची खरेदी ; सूचना डावलल्याचा आरोप

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान संस्था, राज्याच्या आरोग्य विभागाकडून सूचना दिल्या जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या खरेदीबाबत आरोग्य विभागासह राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयातही मार्गदर्शन करण्यात आले आहे. 


मात्र शासन निर्णय व वस्तुस्थितीचा विचार न करता, जिल्ह्यात कोरोनाबाबतची खरेदी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्ह्यात सुमारे ४७ कोटी रुपयांची खरेदी झाली असून याबाबत आता तक्रारींचा सूर उमटू लागला आहे. हा मुद्दा तापत चालल्याने प्रशासनाने वेळीच आपली भूमिका मांडणे आवश्‍यक आहे. 
जिल्हा स्तरावर तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीस आहेत. यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य असून जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.

हेही वाचा- तुम्हीच अंत्यसंस्कार करा असे ऐकावे लागते ; परिचारिका सारिका आनंदे यांचा अनुभव -

जिल्ह्यातील कोविड खरेदीची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर आहे. सध्या जी कोविडसाठी खरेदी झाली आहे याच्या दरात मोठी तपावत आहे. एका महिन्याच्या आत साहित्याच्या खरेदी दरात जमीन-आस्मानचा फरक आहे. ही खरेदी करताना बाजारातील दर, साहित्याची गरज, त्याची उपयुक्‍तता पाहण्याची फारशी कोणी तसदी घेतलेली नसल्याचा आरोप होत आहे. मनमानी पध्दतीने या साहित्याचे वाटप झाले आहे. काही सदस्यांनी गाड्या भरुन जि. प. तून साहित्य नेले तर काहींना या साहित्याचा गंध नाही.


हेही वाचा-अनवट राग कोल्हापूरात घेऊन आलेल्या अल्लादियॉं खॉंसाहेबांची पाचवी पिढीही संगीत सेवेत -

कोरोनासाठी गरजेच्या वस्तू खरेदी न करता इतर साहित्यांची खरेदी व तीही चढ्या दराने का करण्यात आली? ही खरेदी मनमानी पद्धतीने झाली आहे. अनेक साहित्य गोडावूनमध्ये पडून असून त्याचे वितरण झालेले नाही. त्यामुळे या सर्व खरेदीची केंद्र आणि राज्य शासनाकडून चौकशी होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल. 
- राजवर्धन निंबाळकर, सदस्य, जिल्हा परिषद.

संपादन - अर्चना बनगे

go to top