बर्ड फ्लूबाबत अशी घ्यावी काळजी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

आजारी दिसणाऱ्या अथवा सुस्त स्थितीत पडलेल्या पक्षांच्या संपर्कात येऊ नका

कोल्हापूर  - राज्यातील बर्ड फल्यू बाबतची सद्यस्थिती पाहता कुक्कुट पालन व्यवसायीक चिकन विक्रेते, हॉटेल व्यवसायिक व नागरीक यांनी बर्ड फल्यू संबंधी प्रतिबंधात्मक व नियंत्रण आणण्यासाठी खबरदारी/दक्षता घेणे अत्यावश्‍यक आहे. 

महापालिका क्षेत्रात पक्षी आणण्यापूर्वी महापालिकेची परवानगी आवश्‍यक आहे. बर्ड फल्यू हा विषाणू स्थलांतरीत पक्षांमधून पसरत असल्याने संक्रमित ठिकाणांवरून पक्षी आणणे, वाहतूक करण्याची दक्षता घ्यावी. तसेच मनपा क्षेत्रामध्ये पक्षी आणण्यापूर्वी रितसर परवानगी घेण्यात यावी. पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांडयात त्यांना रोज खाद्य दिले जाते अशी भांडी दररोज डिटर्जन्ट पावडरने धुवा. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. एखादा पक्षी मृत झाला तर अशा पक्ष्यांना उघड्या हाताने स्पर्श करू नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षास ताबडतोब कळवा. पक्षी स्त्रावासोबत कोणत्याही स्थितीत संपर्क टाळावा. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना हात पाणी व साबणाने वारंवार धुवा, व्यक्तीगत स्वच्छता राखा, परिसर स्वच्छ ठेवा. कच्चे चिकन/ चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि हॅण्ड ग्लोव्हजचा नियमित वापर करावा. 
पूर्ण शिजवलेल्या (100 डिग्री सेल्सीअस) मांसाचाच खाण्यासाठी वापर करावा. आपल्या गल्लीत अथवा परिसरात तलाव असेल आणि त्या तलावामध्ये पक्षी येत असतील तर या ठिकाणी सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वन विभाग/ पशुसंर्धन विभागास कळविण्यात यावे. कच्चे चिकन/कच्ची अंडी खाऊ नका. अर्धवट शिजलेले चिकन/पक्षी, अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका/ पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेऊ नका.

हे पण वाचा - बदलीच्या हक्कासाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे

आजारी दिसणाऱ्या अथवा सुस्त स्थितीत पडलेल्या पक्षांच्या संपर्कात येऊ नका. यासोबतच एखाद्या भागात मृत पक्षी आढळयास काय दक्षता घ्यावी तसेच मृत पक्षाची विल्हेवाट कशी लावावी या संदर्भात पशु संवर्धन विभाग जिल्हा संवर्धन अधिकारी, उपआयुक्त पशुसंवर्धन कार्यालय यांच्याशी संपर्क करावा. तसेच कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात बर्ड फल्यूबाबत नियंत्रण व उपाययोजना करण्यात सर्व नागरीक, पोल्ट्री फार्म, व्यावसायिक चिकन विक्रेते यांनी दक्षता घेवून सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. 

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take care of bird flu