
तरीही बर्ड फल्यु हा जास्तकरून कोंबड्यांना झाल्यास तो धोकादायक ठरू शकतो.
कोल्हापूर - जिल्ह्यात तुर्त कोठेही बर्ड फल्यूची लक्षणे नाहीत. तरीही काळजी घेण्याचा भाग म्हणून तंदुरस्त आरोग्य असलेल्या चिकनाचा वापरा करावा. एखादा मृत पक्षी दिसल्यास थेट त्याला हात न लावता ग्लोज घालून त्याची हाताळणी करावी तसेच चिकन शंभर अंश तापमाना पेक्षा जास्त तापमानात शिजवून खाल्ल्यास चिकन खाण्यालाही धोका नाही. अशा विविध सूचना शहरातील खाटीक व्यवसायकांना आज देण्यात आल्या.
महापालिका व पशूसंवर्धन विभागातर्फे शहरात आज खाटीक व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यात पशू संवर्धनचे डॉ. सॅम लुड्रिक्स व आरोग्य अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी खाटीक व्यवसायिकांना सूचना दिल्या.
बर्ड फल्युच्या शक्यतेने अनेकांना चिकन, मांस, अंड्या विषयी भीती निर्माण झाली आहे. ही भिती दूर व्हावी, योग्य ती काळजी घेऊन चिकनची विक्री करावी यासाठी चिकन विक्रेत्यांनी काळजीपूर्वक चिकन मांस हाताळावे याबद्दल हे प्रशिक्षण देण्यात आले.
बर्ड फल्युची साथ अन्य जिल्ह्यात किंवा राज्यात आहे. त्यातून कोल्हापुरात अद्यापि एकही बर्ड फल्युचा पक्षी सापडलेला नाही. तरीही खबरदारीचा भाग म्हणून साडे पाचशे कोंबड्याचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. त्याच अहवाल अद्यापि आलेला नाही.
तरीही बर्ड फल्यु हा जास्तकरून कोंबड्यांना झाल्यास तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे चिकन मांस विक्रेत्यांनी सर्वाधिक काळजी घेण्याची गरज आहे. यात पोल्ट्री फार्म चालविणाऱ्यांना प्रशिक्षण आहे. तिथे योग्य ती खबरदारी घेतली जाते. तरीही पोल्ट्रीतून दुकान पर्यंत कोंबडीची वाहतूक करणारे घटक तसेच प्रत्यक्ष चिकन दुकानात चिकन हाताळणारे विक्री करणारे घटक या घटकांनी सर्वाधिक खबरदारी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या.
हे पण वाचा - 'धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा'
अशी ओळखा बर्ड फल्युची लक्षणे
कोंबडीचा तुरा निळसर व लालसर होतो.
कोंबडी जास्त खरखर करते.
नाकातून स्त्राव येऊ लागतो.
पक्षाची ताकद क्षीण होते.
पक्षाच्या पायावर लालसर ठिपके डाग येतात.
हे पण वाचा - भेट इंदिरा गांधींची; कोल्हापूरच्या नेत्यांच्या हिंदीनं सुटला धरणाचा प्रश्न
सूचना अशा
चिकन स्वस्त मिळते म्हणून बिघडलेल्या आरोग्याची कोंबडी खरेदी करू नका.
बिघडलेल्या आरोग्याची कोंबडी विकू नका.
कोंबडी हाताळताना स्वच्छता राखा.
ग्राहकांनी घ्याची काळजी.
कच्चे चिकन मांस हाताळू नका, खाऊ नका.
चिकन गरम पाण्याने धूवा.
चांगले शिजवलेलेच चिकन मांस खा.
संपादन - धनाजी सुर्वे