शिक्षक गिरवताहेत तंत्रस्नेही धडे

Teachers Are Borrowing Technical Lessons Kolhapur Marathi News
Teachers Are Borrowing Technical Lessons Kolhapur Marathi News

सेनापती कापशी : लॉकडाउनचा तिसरा अंक सुरू झाला. तशी त्यांच्या अध्ययनाला गती आली आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यातील शिक्षक एक्‍सेल, वर्ड, पॉवर पॉईंट, ब्लॉग, यूट्यूब चॅनेल, गुगल फॉर्मद्वारे चाचण्या, व्हिडिओ, यासारखी ऍप्लिकेशन विद्यार्थ्यांसाठी कशी वापरता येतील हे उत्स्फूर्तपणे शिकून घेत आहेत. राज्यभरातील व्हाट्‌सऍप ग्रुपमधून विविध लिंकद्वारे त्यांचे अध्ययन सुरू आहे. त्याचा उपयोग संबंधित शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुरूही केला आहे. यामुळे शाळा नाही; पण शिक्षण सुरू आहे.' 

ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना केवळ उच्च शिक्षण आणि शहरापुरती मर्यादित न राहता वाढत्या लॉकडाउनमुळे ती ग्रामीण भागातही येत आहे. ग्रामीण पालकांची आर्थिक स्थिती, मोबाईल नेटवर्क आणि अन्य त्रुटी असल्या तरी अनेक शिक्षकांनी आपल्या पातळीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू ठेवले आहे. ऑनलाईन अध्ययन करणारे संबंधित शिक्षक राज्यभरातील तंत्रस्नेही शिक्षकांकडून संगणक आणि मोबाईलवरील विविध ऍप्लिकेशनचा उपयोग शिक्षणात कशा पद्धतीने करता येतो याबाबतचे मार्गदर्शन घेत आहेत. काही शिक्षक लॉकडाउनच्या काळात सर्वेक्षण, चेक नाक्‍यावरील सेवा, सर्वसामान्यांना मदतीचा हात देण्यात गुंतले आहेत.

विशेषतः विज्ञान आणि गणिताचे अध्यापन करणारे शिक्षक शैक्षणिक व्हिडिओ, चाचण्या करण्यात पुढाकार घेत आहेत. जळगाव येथील एका गटाने शिक्षकांनी शैक्षणिक व्हिडिओ बनवण्यासाठी स्पर्धाही आयोजित केली आहे. व्हाट्‌सऍपवर अनेक ग्रुपमध्ये राज्यभरातील सक्रिय शिक्षक आहेत. त्यामुळे येथे नव्यानाही संधी आहे. यामध्ये सायन्स सर्कल, गणित, इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी, तंत्रस्नेही शिक्षक सारखे ग्रुप करून कोल्हापूर, पुणे मुंबई, जळगाव, अहमदनगर, नाशिक आदी ठिकाणचे शिक्षक एकमेकांना नव्या ज्ञानाची देवाणघेवाण करत आहेत. यातून शैक्षणिक साहित्य निर्मिती होत आहे. कोणतेही राजकीय अथवा वेळखाऊ मेसेज निषिद्ध असणाऱ्या या ग्रुपवर "शिक्षण सुरू आहे.' 

अवेअरनेस सर्टिफिकेट 
कोव्हीड-19 आणि त्याच्या संदर्भात विचारल्या जाणाऱ्या विविध प्रश्‍नातून माहिती, ज्ञान आणि जागृती निर्मिती करून विविध शैक्षणिक संस्थांकडून प्रमाणपत्र दिले जात आहेत. त्यातही हे शिक्षक पुढे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com