कोल्हापूर विमानतळ भूसंपादनास दहा कोटी ;आणखी ६४ एकर जमीन होणार संपादित

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारासाठी दोन वर्षांपासून काम सुरू आहे. विमानतळ विस्तारासाठी लगतची ६४ एकर जमिनीची मागणी केली होती

कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी ६४ एकर जमीन संपादित करण्यास राज्य सरकारने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला दहा कोटी निधी दिल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्य लाभल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. याबाबतचा आदेश आज शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे.

मंत्री पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे, कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारासाठी दोन वर्षांपासून काम सुरू आहे. विमानतळ विस्तारासाठी लगतची ६४ एकर जमिनीची मागणी केली होती.  यानुसार जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता. या ६४ एकर जमिनीच्या मोबदल्यात १० कोटी देण्याचा निर्णय यापूर्वी झाला होता. हा निधी राज्य सरकारने विमानतळ कंपनीकडे वर्ग करण्याचे आदेश आज काढला. राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाल्याने विमानतळाच्या विकासामुळे कोल्हापूर विमानतळावरून दिल्ली, अहमदाबाद, गोवा या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी फायदा होणार असल्याचेही श्री. पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

हे पण वाचा पेच अखेर सुटला ; नाशिक मालेगाव कॅंप येथील उप-अधीक्षक मंगेश चव्हाण यांची शहर पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती 

पाठपुराव्याला यश
विमानतळावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून २७५ कोटींची विकासकामे सुरू आहेत. यात धावपट्टी विस्तारासह नवीन प्रशासकीय इमारत एटीआर बिल्डिंग तयार केली जात आहे. ही कामे प्रगतिपथावर असून, लवकरच पूर्ण होणार आहेत. विमानतळ विस्तारीकरणासाठी निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten crore for Kolhapur Airport land acquisition