आता चप्पल, बूट अन्‌ बेल्टही बाहेर.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tenth and twelve exam preparation new Rule in secondary board kolahapur marathi news

बारावीच्या परीक्षेस अठरा फेब्रुवारीपासून तर दहावीच्या परीक्षेस तीन मार्चपासून सुरुवात होत आहे. विद्याथ्यांनसाठी परीक्षा केंद्रांसाठी माध्यमिक मंडळाचा नवा नियम..

आता चप्पल, बूट अन्‌ बेल्टही बाहेर....

कोल्हापूर : दहावी-बारावीच्या परीक्षेला या वर्षापासून चप्पल, बूटच नव्हे तर कंबरेचा बेल्टही वर्गाबाहेर ठेवावा लागणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने या 
नियमाची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना विभागीय 
मंडळांना दिली आहे.

बारावीच्या परीक्षेस अठरा फेब्रुवारीपासून तर दहावीच्या परीक्षेस तीन मार्चपासून सुरुवात होत आहे. विद्यार्थी अभ्यासात व्यस्त असताना दुसऱ्या बाजूला विभागीय मंडळाच्या स्तरावर परीक्षेची तयारी सुरू आहे. केंद्र संचालकांच्या बैठका पूर्ण झाल्या आहेत. बारावीच्या सध्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. बारावीसाठी तिन्ही जिल्ह्यात १६२, दहावीची ३५४ केंद्रे आहेत. जिल्ह्यात सात भरारी पथके तैनात असणार आहेत.

हेही वाचा- दिव्यांग असूनही तिला शिकायच आहे पण....

कॉपी लपवण्याची युक्ती
कॉपी करायचे म्हटले की, विद्यार्थी वेगवेगळी शक्कल लढवत होते. शर्टच्या आतमध्ये हाताला कॉपी गुंडाळल्या जात होत्या. पेपर लिहिण्यासाठी जे पॅड वापरायचे त्यावर कॉपी केली जायची. चप्पल, बुट तर कॉपी लपविण्याचा हमखास मार्ग, पर्यवेक्षकाची नजर चुकवून काही मिनिटात कॉपी उतरली जायची. नंतर विद्यार्थ्याला बाहेर तपासूनच वर्गात प्रवेश दिला जायचा.

हेही वाचा- चालकाचे प्रसंगावधान आणि दैव बलवत्तर होते म्हणून टळला हा अनर्थ...

कॉपी करता येऊ नये म्हणून

कॉपीचे नवे मार्ग शोधले जाऊ लागल्याने चप्पल, बुट परीक्षेला बाहेर काढावे लागणार आहे. बेल्टमध्ये कॉपी लपविली जाऊ नये यासाठी बेल्टही काढून ठेवावा लागणार आहे. मोबाईल तसेच कॅलक्‍युलेटरला आधीपासूनच बंदी आहे. फॅन्सी घड्याळाच्या साहय्याने कॉपीची पळवाट सोधली जाऊ नये यासाठी हातामध्ये केवळ साधे घड्याळ वापरण्यास परवानगी दिली जाणार आहे.
पूर्वी परीक्षा केंद्राच्या आवारात व्हीडीओ चित्रिकरण केले जायचे. झेरॉक्‍स सेंटरलाही विशिष्ट अंतरावर बंदी असायची. दहावी बारावीचे वर्ष म्हंटले अनेक विद्यार्थी हे वर्ष गांभीर्याने घेतात.

हेही वाचा- सावधान ! तर डॉक्‍टरांवर होणार आता कारवाई .. का ते वाचा..

हव्या त्या महाविद्यालयात प्रवेशास अडचणी

बेस्ट ऑफ फाईव्हमुळे गुणांचा फुगवटा वाढू लागल्यानंतर वीस प्रात्यक्षिक परीक्षेचे वीस गुण देणे बंद झाले. अन्य केंद्रीय बोर्डाच्या तुलनेत राज्य मंडळाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना टक्केवारीमुळे त्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यात अडचणी झाल्या. त्यामुळे शाळांच्या स्तरावर पुन्हा वीस गुण देण्यास मुभा दिली गेली. परीक्षेला चप्पल बूट, बेल्ट बाहेर काढूनच पेपर लिहावा लागणार आहे. नवा नियम किती गांभीर्याने घेतला जातो त्यावर त्याचे यश अवलंबून आहे.

यावर्षी नियमाची काटेकोर अंमलबजावणी

परीक्षा केंद्रांत चप्पल, बूट आणि बेल्टही नेण्यास मनाई असणार आहे. नियमाची यावर्षी काटेकोर अंमलबजावणी होईल. तशी सूचना राज्य मंडळाकडून दिली गेली आहे.
- सुरेश आवारी, सचिव, कोल्हापूर विभागीय मंडळ

टॅग्स :Kolhapur