व्हिडीओ : कोल्हापूर शहरात झाला भीषण अपघात ; सीसीटीव्हीत कैद झाला तो थरार...

राजेश मोरे
शनिवार, 11 जुलै 2020

दुचाकीस्वार हवेत उडून खाली पडले तर ती मोटार ही रस्ता दुभाजक वरून पलटी झाली.

कोल्हापूर - धैर्यप्रसाद चौक परिसरात आज सकाळी मोटार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला तर पाठीमागे बसलेला तरुण आणि मोटार चालक हे दोघे गंभीर जखमी झाले. पुरुषोत्तम वासुदेव बालिगा (वय 58) रा. कदमवाडी परिसर असे मृताचे नाव आहे. याबाबतची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सकाळी सातच्या सुमारास पुरुषोत्तम बालिगा हे नातेवाईकांसह भविष्य निर्वाह निधी कार्यालय मार्गे उलट दिशेने सदर बाजार च्या दिशेने जात होते. त्याच वेळी नैतिक कर्नावट हे ताराराणी चौकातून ताराबाई पार्कच्या दिशेने जात होते. सदर बाजार चौकाच्या दिशेने बालिगा यांच्या दुचाकीची व कर्नावट यांच्या मोटाराची जोराची धडक झाली.यात दुचाकीस्वार हवेत उडून खाली पडले तर मोटार ही रस्ता दुभाजक वरून पलटी झाली. यात बालिगा हे जागीच ठार झाले तर त्यांच्या मागे बसलेला नातेवाईक व मोटार चालक कर्नावट हे दोघे गंभीर जखमी झाले.

वाचा - कोल्हापूर लॉकडाऊनची अफवाच...

 

संपादन - मतीन शेख

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: terrible accident in Kolhapur city thrill captured in cctv