कोल्हापुरातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने आता घेतला आहे 'हा' निर्णय

Thermal screening for above fifty year old people in kolhapur
Thermal screening for above fifty year old people in kolhapur
Updated on

कोल्हापूर : शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पन्नास वर्षावरील नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग तसेच ऑक्‍सीमीटरद्वारे पल्स रेटची माहिती घेतली जाणार आहे. प्रभाग सचिव तसेच अन्य कर्मचाऱ्यांकडे प्रत्येकी पाच थर्मल स्क्रिनिंगसाठी गन तसेच ऑक्‍सीमीटर दिली गेली आहेत. 
पन्नास वर्षावरील नागरिकांची दक्षता घेण्यासाठी महापलिका प्रशासन सर्व 81 प्रभागात ही तपासणी करणार आहे. त्यासाठी आशा वर्कर्सची मदत घेतली जाणार आहे.

शहर परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचा धोका अधिक असतो. थर्मल स्कीनिंगद्वारे शरीरातील तापाचे मोजमाप होईल. विशिष्ट तापमानाच्या पुढे नोंद झाली तर रेड सिग्ग्नल लागतो. ऑक्‍सीमीटरद्वारे शरीरातील प्राणवायू तसेच पल्स रेटची मोजणी होते. ज्यांची तपासणी झाली त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक तसेच तापाचे प्रमाण याची माहिती भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली जाणार आहे. 

महापालिकेची यंत्रणा गेल्या चार महिन्यापासून कोव्हिडच्या कामी व्यस्त आहे. कोरोना रुग्ण सापडल्यानंतर त्या भागात औषध फवारणी करणे, संपर्कातील लोकांना क्वारंनटाईन करणे, बॅरिकेड लावून भाग बंदिस्त करणे यासाठी यंत्रणा कार्यरत राहते. आयसोलेशन यंत्रणाही कार्यन्वित आहे. क्वारंनटाईन सेंटर सध्या हाऊसफुल्ल आहेत. स्वॅब घेतल्यानंतर रिपोर्ट पॉझिटीव्ह येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. प्रशासनाने होम क्वारंनटाईवर अधिक भर दिला आहे. 

नजीकच्या काळातही रुग्णांच्या संख्येच वाढ होऊन त्याचा ताण यंत्रणेवर येऊ नये यासाठी घरोघरी पन्नास वर्षावरील नागरिकांची तपासणी होणार आहे. ताप तसेच ऑक्‍सिजनचे प्रमाण दोन्ही स्तरावर तपासणी होईल. त्यातून हायरिस्कमध्ये किती लोक आहेत. याची माहिती मिळेल. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णावर घरीच उपचाराचा विचार पुढे आला पण त्याला स्थानिक नागरिकांचा विरोध होऊ लागला. खासगी दवाखान्यांच्या बहुतांशी ओपीडी बंद आहेत. काही ठिकाणी मोजक्‍याच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा स्थितीत 50 वर्षावरील नागरिकांना धोका उदभवून त्यांचे आरोग्य धोक्‍यात येऊ नये यासाठी तपासणी होत आहे. घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती घेतली जाईल. त्यातून किती जणांना औषधोपचाराची गरज आहे याची माहिती पुढे येईल.

ऑक्‍सिीमीटर बाबत प्रश्‍नचिन्ह 

ऑक्‍सीटमीटरद्वारे तपासणी करायची म्हंटले तरी संबंधित नागरिकाच्या बोटाचा थेट संपर्क येतो. एखाद्या लक्षणे असलेल्या नागरिकांनी बोट लावले आणि त्याचवेळी लक्षणे नसलेल्या नागरिकांनेही बोट लावले तर करायचे काय असा प्रश्‍न प्रभाग सचिवांना पडला आहे. प्रत्येकाच्या हाताला सॅनिटायजर लावण्याला मर्यादा आहेत. त्यामुळे ऑक्‍सीमीटरच्या वापराबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com