esakal | सावधान : आता चोरट्यांचा बॅटऱ्यांवर डल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

thief new fanda attack on batteries

आयसोलेशनजवळील प्रकार; दीड लाखाची चोरी

सावधान : आता चोरट्यांचा बॅटऱ्यांवर डल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : आयसोलेशन हॉस्पिटलसमोरील वाळू अड्ड्यातील ट्रकचे केबीन फोडून चोरट्याने सुमारे १५ बॅटऱ्यांवर डल्ला मारला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे संतप्त झालेल्या ट्रकचालकांनी थेट राजारामपुरी पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली.


घटनास्थळावरून मिळालेली माहिती  

आयसोलेशन हॉस्पिटलसमोरील मोकळ्या जागेत वाळू अड्डा आहे. येथे अनेक वर्षांपासून वाळूचे ट्रक पार्किंग केले जातात. येथे सुरक्षारक्षकही नेमण्यात आला आहे. मात्र, दिवाळी सुटीनिमित्त तो गावी गेला. या संधीचा फायदा उठवत चोरट्याने वाळू अड्डयातील ट्रकवर निशाणा साधला. या ट्रकच्या केबीनची कुलपे तोडून त्याने आत प्रवेश केला. सुमारे १५ हजार रूपये किमंतीला मिळणाऱ्या पंधरा एक बॅटरा बाहेर काढून त्या लंपास केल्या.

हेही वाचा- कोल्हापुरात १७ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

आज सकाळी वाळू ओढण्यासाठी हमाल येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याची माहिती ट्रक मालकांना दिली. यातील बहुतांशी मालक हे राजेंद्रनगर आणि पाचगाव परिसरातील आहेत. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. यापूर्वीही अशाच पद्धतीने बॅटरी, जॅक, पाने चोरीला जाण्याचे प्रकार घडले आहेत. पोलिसांनी या चोरट्याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी ट्रक चालकांकडून करण्यात 
येत होती.

संपादन- अर्चना बनगे