मोठी बातमी - कोल्हापुरात आणखी ३४ जणांना कोरोनाची लागण

thirteen new corona positive cases in kolhapur district
thirteen new corona positive cases in kolhapur district

कोल्हापूर- आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत तब्बल ३४ नव्या कोरोना रूग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ११०३ झाली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये पन्हाळा आठ, कसबा बावडा एक, गडहिंग्लज चार, हातकणंगले एक,  शिरोळ दोन, कागल एक, गांधीनगर एक, टोप एक, कोल्हापूर शहर पाच, गारगोटी एक, राधानगरी एक, शाहुवाडी  एक तर इचलकरंजीतील सहा व्यक्तींचा समावेश आहे.  

हॉटेल व्यावसायिक तरुणाचा मृत्यू

दरम्यान, काल वळीवडे (ता. करवीर) येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या हॉटेल व्यावसायिक तरुणाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.  त्यामुळे ग्रामपंचायतीने तीन दिवस वळीवडे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

काल दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत २१ ने वाढ झाली होती. पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमध्ये आजरा एक, करवीर चार, गडहिंग्लज एक, कोल्हापूर शहर एक, तर इचलकरंजीतील सहा व्यक्तींचा समावेश आहे. दिवसभरात सहा व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. 


दरम्यान, या हॉटेलमालकावर गेल्या आठवड्यात ताप आल्याने खासगी रुग्णालयात उपचार झाले. प्रकृती खालावल्याने त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. या ठिकाणी त्याचा स्वॅब घेण्यात आला. परवा रात्री उशिरा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. काल रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. समाज कार्यात हिरीरीने सहभाग घेणाऱ्या तरुणाचा अकाली मृत्यू झाल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या तरुणाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एप्रिलमध्ये गावात सॅनिटायझर मशीन बसविले होते. लॉकडाउनमध्ये गरजू, गरिबांना अन्नधान्याच्या स्वरूपात मदत केली होती.

जिल्ह्यात क्वारंटाईन असलेल्यांपैकी २०८ व्यक्तींचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आहेत. सर्वांची  प्रकृती स्थिर आहे. उपचार घेणाऱ्यातील एकूण सात कोरोनाग्रस्त गंभीर आहेत. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात झालेल्या आरोग्य तपासणीत ६४० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. 
 
 दृष्टिक्षेपात
कोरोनाग्रस्त --- ११०३ 
कोरोनामुक्त------७९६  
मृत्यू ------------------२०
सध्या उपचार घेणारे  ----२४८

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com