तेरा हजार जणांचा अहवाल निगेटिव्ह 

शिवाजी यादव 
बुधवार, 27 मे 2020

बाहेरगावाहून येणाऱ्यांपैकी कोरोनाच्या व्याख्येत बसतील, अशी लक्षणे असलेल्या व्यक्तीची स्वॅब तपासणी करण्यावर आरोग्य यंत्रणेने भर दिला. गेल्या दहा-बारा दिवसांत रोज 20 ते 54 कोरोनाबाधित सापडू लागले. त्यांना तातडीने कोवीड केंद्र व सीपीआरमध्ये उपचार सुरू झाले. त्यातून सामाजिक संसर्ग रोखण्यास मदत झाली आहे. 

कोल्हापूर : बाहेरगावाहून येणाऱ्यांपैकी कोरोनाच्या व्याख्येत बसतील, अशी लक्षणे असलेल्या व्यक्तीची स्वॅब तपासणी करण्यावर आरोग्य यंत्रणेने भर दिला. गेल्या दहा-बारा दिवसांत रोज 20 ते 54 कोरोनाबाधित सापडू लागले. त्यांना तातडीने कोवीड केंद्र व सीपीआरमध्ये उपचार सुरू झाले. त्यातून सामाजिक संसर्ग रोखण्यास मदत झाली आहे. 

आज दिवसात 768 तर आजवर 13 हजारांहून अधिक व्यक्तींचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने बाहेरून येणाऱ्यांबाबत व्यक्त होणाऱ्या शंका दूर होऊन सामाजिक भीती दूर होण्यास मदत झाली आहे. 52 दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत होती, यात मुंबई पुण्यातून आलेले सर्वाधिक रुग्ण आढळू लागले. लॉकडाउनमध्ये मुंबई पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांत नोकरी व्यवसायानिमित्त गेलेला मोठा वर्ग अडकून पडला.

नातेवाइकांपासून दूर असलेला हा वर्ग हवालदिल झाला. अनेक गैरसोयीना तोंड द्यावे लागले, त्यानंतर राज्य शासनाची ऑनलाईन परवानगी घेऊन तसेच वैद्यकीय तपासणी करून जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी दिली. त्यानुसार अनेकजण खासगी गाड्या करून गावी आले. यात कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, शाहूवाडी, गडहिंग्लज, पन्हाळा गगनबावडा अशा डोंगरी, जंगली तालुक्‍यातील अनेक लोक मुंबईत होते ते कुटंबीयांसह गावी येऊ लागले. अशा सर्वांना जिल्हा सीमेवर अडवून प्रत्येकाला वैद्यकीय तपासणी करणे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने सुचना केल्या. त्यानुसार तपासणी वेळी ज्यांना कोरोनाशी संबधीत लक्षण आढळले त्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातून स्वॅब तपासणी करणाऱ्या शासकीय प्रयोगशाळेवर ताण जरूर आला, मात्र सरसकट स्वॅब तपासणी कशाला केली. म्हणून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना राज्य शासनाडकडील "तज्ज्ञांनी' तोंड सुख घेतले. 

वेळीच उपचाराने होणार कोरोनामुक्त 
गेल्या 52 दिवसांत सुमारे 20 हजारांवर स्वॅब घेतले. त्यांचे अहवाल प्राप्त होऊ लागले. यात आजवर आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त मुंबई, पुणे, सोलापूर या भागातून प्रवास करून आलेले होते, अशांना वेळीच उपचारासाठी दाखल करता आले. त्यांच्यावर उपचार सुरू करून पाच ते आठ दिवस झाले पुढे आणखी पाच ते दहा दिवस उपचार होऊन बहुतेकजण कोरोनामुक्त म्हणून बाहेर पडलतील, अशी स्थिती आहे. कोरोनाबाधितांपैकी फक्त 6 व्यक्ती गंभीर आहे. उर्वरित सर्वांची प्रकृती उपचाराला साथ देत आहे, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirteen thousand people reported negative

फोटो गॅलरी