रस्त्यावर फिरू नको म्हणून सांगणारा तु कोण? जिल्हाधिकारी नियुक्त सदस्यांना धमक्‍या

Threats to District Appointed Members
Threats to District Appointed Members

कोल्हापूर : मला तोंडाला मास्क बांध, रस्त्यावर फिरू नको म्हणून तु सांगणार कोण, तुझ्यावर केसच दाखल करतो अशा एक ना अनेक धमक्‍या ऐकत ग्रामपंचायतीच्यापातळीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नियुक्त केलेले समिती सदस्य प्रामाणिकपणे काम करत आहेत. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गावात बाहेरचा कोण आला? इतर जिल्ह्यातून कोण आले, याशिवाय गावात नवीन दिसणाऱ्या व्यक्तिला दवाखान्यात तपासणी करून आणण्यापर्यंत या ग्रामपंचायची समित्यांचे सदस्य काम करत आहेत. मात्र, काही लोकांच्या आणि तरुणांच्या बेफिकीरी पणाचा सदस्यांसह ग्रामस्तांना त्रास होत आहे. वास्तविक या समिती सदस्यांना कोणतेही मानधन मिळणार नाही, पण चांगले काम करतात म्हणून किमान ग्रामस्तांनी तरी त्यांचे कौतुक करणे बाजुलाच पण धमक्‍या ऐकून घ्याव्या लागत असल्याचे चित्र आहे. 

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर महसूल, पोलीस, आरोग्यासह इतर यंत्रणा सज्ज केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रत्येक गावात संचारबंदीचे पालन करावे, बाहेरील लोकांवर नजर ठेवावी यासाठी गावपातळीवरच समिती नियुक्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतला. त्यानूसार गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली सर्व कमिटी प्रामाणिपणे काम करत आहेत. गावात रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडाला मास्क लावायला लावणे, आरोग्य सुविधा व जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा होतो किंवा नाही यावर नियंत्रण ठेवले जात आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि चार सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, दोन सामाजिक कार्यकर्ते असे या समितीचे स्वरुप आहे. 

गाव कोरोनामुक्त रहावे यासाठी ही सर्व सदस्य मंडळी रात्रं-दिवस काम करत आहेत. प्रत्येकाला विनंती करून सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन करत आहेत. मोठ्या गावातील कॉलनी, वस्त्या, बेघरसह दलित वस्तीमध्येही जनजागृती करत आहेत. मात्र, काही ठराविक लोकांच्या असहकार्यामुळे गावातील शांततेचा भंग होत आहे. एखादा समिती सदस्य तोंडाला मास्क बांधा, गावातून विनाकारण फिरू नका असे आवाहन करत असेल तर त्यालाच उलट उत्तर देवून त्यांचा अपमान करत आहेत. कोण काय करतोय बघतोच, तुझ्यावर गुन्हाच दाखल करतो, तुला सोडत नाही अशा धमक्‍या देत, गावातून फिरू नको म्हणून सांगणारा तु कोण, अशी अरेरावीही केली जात आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षकांनी गावपातळीवरील या समिती सदस्यांना संरक्षण पुरवावे लागणार आहे. 
 

जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या समिती सदस्यांना धमक्‍या देणाऱ्यांवर ज्या-त्या तालुक्‍यातील पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. 90 टक्के गाव शांत, नियोजनानूसार दैनंदिन काम करत आहेत. तरीही, काही बेफिकिरी लोकांमुळे गावची स्थित बिघडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. 


गावात काही असे लोक आहे. जे गावातील नियोजन मोडण्यास कारणीभूत ठरत आहे. आमच्याकडेही काही तक्रारी आल्या आहेत. दरम्यान, समितीने आता जे लोक सांगूनही ऐकणार नाहीत, त्यांच्यावर आपतकालिन कायद्यांतर्गत तातडी गुन्हे नोंद करावेत. 
- शितल भांमरे, तहसीलदार, करवीर, कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com