गडहिंग्लजमधील तिन्ही मुख्य शासकीय कार्यालये प्रतिबंधित क्षेत्र घोषित...वाचा काय झाले

The Three Main Government Offices In Gadhinglaj Have Been Declared Restricted Areas Kolhapur Marathi News
The Three Main Government Offices In Gadhinglaj Have Been Declared Restricted Areas Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : शहरातील पोलिस ठाणे, तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तालुक्‍याच्या दृष्टीने प्रमुख असलेल्या तिन्ही शासकीय कार्यालयांत कोरोनाबाधित आढळल्याने धक्का बसला आहे. पोलिस ठाणे आणि तहसील कार्यालय एकाच आवारात असल्याने हे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे. प्रांत कार्यालयाचे कामकाज 50 टक्के कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. 

शहरासह तालुक्‍यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना शासकीय कार्यालये मात्र "सेफ'मध्ये होती. प्रत्येक कार्यालयाने बाळगलेल्या खबरदारीमुळे हे शक्‍य झाले होते; परंतु गेल्या आठवड्यात पोलिस ठाण्यात पहिल्यांदा कोरोनाचा शिरकाव झाला. या ठिकाणी सलग तीन पोलिस कर्मचारी बाधित आढळले.

त्यानंतर आज अँटिजेनच्या रॅपिड टेस्टमध्ये तहसील आणि प्रांत कार्यालयांतील प्रत्येकी एक महिला कर्मचारी बाधित आढळल्याने धक्का बसला आहे. तालुक्‍यातील जनतेच्या दृष्टीने ही तिन्ही कार्यालये महत्त्वपूर्ण आहेत. याच ठिकाणी कोरोनाबाधित सापडल्याने या कार्यालयांमधील कामकाजावर परिणाम झाला आहे. तिन्ही कार्यालयांत सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. पोलिस ठाण्यात रोज दोन वेळा हा प्रतिबंधात्मक उपाय राबवला जात आहे. 

पोलिस ठाणे आणि तहसील कार्यालय एकाच आवारात आहेत. पोलिस ठाण्यात अत्यावश्‍यक काम असलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे. तहसील कार्यालयाचे कामकाज तर रविवारपर्यंत (ता. 16) बंद करण्यात आल्याचे तहसीलदार दिनेश पारगे यांनी सांगितले. अत्यावश्‍यक कामासाठीच तहसील कार्यालय व पोलिस ठाणे सुरू असून नागरिकांनीही याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तहसील कार्यालयाच्या आवारातील राजर्षी शाहू सुविधा केंद्रही बंद केले आहे. त्यामुळे विविध दाखले देण्याचे कामकाज ठप्प झाले आहे. प्रांत कार्यालयातील कामकाज मोजक्‍या कर्मचाऱ्यांवर सुरू ठेवले असून अधिकृत अहवाल आल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार कार्यालयाचे कामकाज बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालय सॅनिटायझेशन करण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com