निवृत्त होत असलेल्या तीन शिक्षकांनी शाळेला दिली अनोखी भेट, वाचा राजगोळी खुर्द विद्यालयाच्या शिक्षकांचा विधायक पायंडा

Three Teachers Have A Unique Gift To The School Kolhapur Marathi News
Three Teachers Have A Unique Gift To The School Kolhapur Marathi News
Updated on

कोवाड : राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील माध्यमिक विद्यालयाच्या तीन शिक्षकांनी खोली बांधकामाच्या स्वरूपात शाळेला सेवा निवृत्तीची भेट दिली. मुख्याध्यापक व्ही. एन. देसाई (हुंदळेवाडी), एस. बी. कुंभार (कुदनूर) व के. ए. मुल्ला (किणी) हे शिक्षक येत्या सहा महिन्यात निवृत्त होत आहेत. तत्पूर्वीच त्यांनी शाळेसाठी एका खोलीचे बांधकाम करुन दिले आहे. त्यांच्या या दातृत्वामुळे शाळेच्या शैक्षणिक उठावाच्या कामाला गती मिळाली आहे. 

गेल्या वर्षीपासून देणगीदारांच्या सहकार्यातून शाळेच्या जुन्या इमारतीच्या शेजारी नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. राघवेंद्र गणपतराव इनामदार व भारती इनामदार यांच्या हस्ते इमारतीचा भूमिपुजनाचा कार्यक्रम झाला. इमारतीच्या उभारणीसाठी राजगोळी येथील कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या महिला सरपंच सावित्री पाटील, निंगाप्पा पाटील यांच्यासह निलकंठ कुंभार, बाबू मोदगेकर, माजी मुख्याध्यापक अमृतराव देसाई, गुंडू कांबळे, बसवाणी दावलट्टी, किरण आंबुलकर, उपसरपंच धोंडीबा तोंडगे, लक्ष्मीबाई मोरे, स्वप्निल सुतकट्टी, विलास माने, महादेव धुळा, विनोद धबाले, विलास पाटील, परशराम सुतार, राजू खातेदार, संतोष शिरगवे, विक्रम पाटील, सुनिल पाटील, बाजीराव कडोलकर, सुनिल मोरे.

यांबरोबरच गौतम पाटील, प्रमोद कवटेकर, शिवलिंग सोलापूरे, महादेव तोंडले, बसवाणी भोसले, शिवाजी कडोलकर, मलगोंडा पाटील, अनंत कुलकर्णी, रावसाहेब पाटील, महावीर पाटील, सरदार मंगसुळी, परशराम कांबळे, विनोद कांबळे, विठ्ठल खातेदार, दुरदुंडेश्‍वर दड्डी, सरपंच मावळेश्‍वर कुंभार, महेश पाटील, रमेश पाटील, विरभद्र मठपती, महालिंग गस्ती, जोतिबा कोणेरी,देवजी कांबळे,परसू मोरे, बसवाणी हत्तरगी, राजू कुंभार, कुदनूरच्या माजी सरपंच विजयालक्ष्मी कोकितकर, बाळासाहेब कोकितकर, संतराम भांदुर्गे, रामचंद्र भांदुर्गे, रामचंद्र यादू पाटील यांच्या सहकार्यातून शाळेची दुमजली इमारत उभे राहिली आहे. मुख्याध्यापक देसाई, मुल्ला व कुंभार या शिक्षकांनीही इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका खोलीचे बांधकाम करून दिल्याने आदर्श बालक मंदिर नावाने शाळेची इमारत उभे राहिली आहे. 

जडणघडणीत आपलेही योगदान असावे याहेतूने मदत
देणगीदारांच्या सहकार्याने शाळेची नवीन इमारत उभे राहिली आहे. शाळेच्या भौतिक सुविधांत वाढ होऊन राजगोळी परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्याना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, याउद्देशाने परिसरातील अनेक लोकांच्या सहकार्याने शाळेच्या विकासाला गती मिळाली. शाळेच्या जडणघडणीत आपलेही योगदान असावे, याहेतूने खोलीचे बांधकाम करून दिले. 
- व्ही. एन. देसाई, मुख्याध्यापक 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com