esakal | बेळगावात 'द बर्निंग कार' चा थरार...
sakal

बोलून बातमी शोधा

 thrill of The Burning Car in Belgaum

सकाळच्या सुमारास शौर्य चौकाकडून पाईपलाईनकडे इंडिका व्हिस्टा कार जात होती. मिलेटरी महादेव मंदिरनजिक कार येताच चालत्या कारने अचानक पेट घेतला.

बेळगावात 'द बर्निंग कार' चा थरार...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव - कॅंम्प परिसरातील मिलेटरी हॉस्पीटलनजिक मंगळवार (ता.2) सकाळी बर्निंक कारचा थरार घडला. सुदैवानेच यात मोठा अनर्थ टळला असून चालक किरकोळ जखमी झाला. अग्निशामक दलाच्या जवानानी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करुन आग आटोक्‍यात आणली. मात्र, या घटनेमुळे काहीवेळ वाहनचालकांची घाबरगुंडी उडाली.

आज सकाळच्या सुमारास शौर्य चौकाकडून पाईपलाईनकडे इंडिका व्हिस्टा कार जात होती. मिलेटरी महादेव मंदिरनजिक कार येताच चालत्या कारने अचानक पेट घेतला. इंजिनधून आग आणि धुरीचे लोळ बाहेर पडताच चालकाने प्रसंगावधान राखत कार रोखली. कारमधील प्रवास तातडीने बाहेर पडले. मात्र, यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला. चालत्या कारने पेट घेतल्याचे पाहून रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या इतर वाहन चालकांची धावपळ उडाली. काहीनी केवळ फोटो आणि व्हिडिओ चित्रिकरण करण्यात धन्यता मानली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानानी घटनास्थळी धाव घेउन आग आटोक्‍यात आनली. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्‍वास सोडला. कॅम्प पोलिसांनी घटानास्थळी भेट देउन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक डी. संतोषकुमार अधिक तपास करीत आहेत.

go to top