Video : महाराष्ट्र सरकारला धन्यवाद देत,ते राजस्थानी पर्यटक गेले आपल्या गावी....

Tourists Rajasthan Thank you  from Government of Maharashtra
Tourists Rajasthan Thank you from Government of Maharashtra

कोल्हापूर : लॉकडाउनमुळे कोल्हापूर शहरात अडकलेल्या राजस्थान येथील सुमारे 228 पर्यटक,व्यापारी आज तब्बल दोन महिन्यानंतर आपल्या गावी जाण्यासाठी रवाना झाले. आम्ही जाउ शकतो की, नाही?अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र सरकारने आणि कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाने चांगले सहकार्य केल्याने आम्ही आमच्या गावी जात आहोत, कोल्हापूरकरांना व राज्यसरकालाही आमचे धन्यवाद,असे म्हणत आज हे पर्यटक चार मिनी बस आणि कांही खासगी वाहनाने सायंकाळी रवाना झाले. 


मार्च महिन्यात कोल्हापूरात पर्यटनासाठी आले आणि व्यापारानिमित्त कोल्हापूरात आलेले कांही पर्यटक व व्यापारी केंद्र सरकारने कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे अडकले होते. पहिले लॉकडाउन 24 मार्चला सुरु होते.ते 14 एप्रिलपर्यंत राहिले.त्यांनतर हे लॉकडाउन 3 मे आणि आता 17 मे पर्यंत वाढले आहे. त्यामुळे आता आम्ही किती काळ येथे अडकतो, राजस्थानला जाउ शकतो की नाही?अशी परिस्थिती निर्माण झाली होती.पण महाराष्ट्र सरकारने परगावच्या अडकून पडलेल्या नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचा मार्ग रिकामा झाला.

या कामी राजस्थानी समाजाचे मोहब्बत सिंग, स्थानिक नगरसेवक ईश्‍वर परमार, राजेश राठोड यांच्यासह या समाजातील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी कार्यालय,तसेच महापालिका व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व प्रक्रिया पुर्ण करुन या 228 नागरिकांना घरी पाठविण्याची प्रक्रिया पुर्ण केली.त्यानुसार शुक्रवारी(ता.8) सायंकाळी हे सर्व राजस्थानी नागरिक आपापल्या गावी रवाना झाले. राजस्थानमधील तीन जिल्ह्यातील हे नागरिक आहेत.यामध्ये महिला आणि मुलींचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com