शाब्बास पोरांनो! पन्हाळ्याची मासेमारी आफ्रिका खंडातील पद्धतीशी मिळती-जुळती, विद्यार्थ्यांचे संशोधन

traditional fisherman business africa to panhala research of shivaji vidyapeeth students in kolhapur
traditional fisherman business africa to panhala research of shivaji vidyapeeth students in kolhapur

कोल्हापूर : पन्हाळा परिसरातील पारंपरिक पद्धतीच्या मासेमारीचे मूळ हे आफ्रिका खंडातील असल्याचे सांगितल्यास आश्‍चर्य वाटले नाही तर नवलच. शेकडो वर्षांपासून पन्हाळा परिसरातील गोड्या पाण्यातील हंगामी मासेमारी करण्याची पद्धत आफ्रिका खंडातील मासेमारीशी जुळणारी असल्याचे संशोधन शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. 

डॉ. एम. पी. भिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रज्ञा डवरी, दीप्ती मोहिते, आफरीन नदाफ, दिग्विजय चौकीकर यांनी गोड्या पाण्यातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी होणाऱ्या ठिकाणाची  माहिती संकलित केली. त्याचा अभ्यास करताना पन्हाळा तालुक्‍यातील गोड्या पाण्यातील हंगामी मासेमारी करण्याची पद्धत थेट आफ्रिका खंडातील पद्धतीशी तंतोतंत मिळती-जुळती असल्याचे लक्षात आले. मासेमारीसाठी वापरली जाणारी उपकरणे, जाळीचे नावही आफ्रिका खंडाप्रमाणेच उच्चारले जाते. ही पद्धत विशेषतः हंगामी मासेमारी करणारे मच्छीमार वापरतात.

आफ्रिका खंडातही याच पद्धतीने हंगामी मासेमारी होते. ब्रिटिश राजवटीच्या आधी अथवा त्या दरम्यान खलाशी अथवा इतर स्रोतांद्वारे ही पद्धत येथे रुजू झाली असल्याची शक्‍यता येथील स्थानिक वर्तवितात. काळाच्या ओघात जाळीसाठी झाडांच्या सालीऐवजी नायलॉनचा दोरा वापरला जात असल्याचा बदल घडला आहे. हे संशोधन इंटरनॅशनल जर्नल ऑफ फिशरीस अॅण्ड ॲक्वेटिक स्टडीजमध्ये प्रसिद्ध झाले असून, यामुळे दोन खंडांतील सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा परस्पर संबंध समोर 
आला आहे. 

"आशिया खंडातील मासेमारीच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा आफ्रिक खंडातील पद्धत वेगळी आहे. मुळात एखादी पद्धत तेथील भौगोलिक परिस्थिती आणि मिळणारे मासे यावर अवलंबून असते. मात्र, आशिया खंडात आफ्रिका खंडातील पद्धतीचा वापर ही बाब महत्वाची असून, याबाबत विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन महत्त्वपूर्ण आहे."

- डॉ. एम. पी. भिलावे
 

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com