पोलिस निरीक्षक प्रवीण चौगले, नवनाथ घोगरेंची बदली 

राजेश मोरे
Saturday, 31 October 2020

 

परिक्षेत्रातील 91 अधिकाऱ्यांचा समावेश 

कोल्हापूर : परिक्षेत्रातील एकाच जिल्ह्यात कार्यकाल पूर्ण झालेल्या पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक अशा 91 जणांच्या बदल्या झाल्या. यात शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांची सांगलीला बदली झाली. तसेच सागंलीतील पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळेंची कोल्हापुरला नियुक्ती झाली. 

एकाच जिल्ह्यात कार्यकाल पूर्ण झालेल्या 14 पोलिस निरीक्षक 30 सहायक पोलिस निरीक्षक आणि 47 उपनिरीक्षकांच्या बदल्याचे आदेश आज विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी जारी केले. पोलिस निरीक्षक  नवनाथ घोगरे व संजय पतंगे यांची सातारा येथे बदली झाली. तसेच सांगलीच्या स्नेहा गिरी व सोलापूरचे विजय पाटील यांची कोल्हापूरला बदली झाली. 

बदली झालेल्या कोल्हापुरातील अधिकाऱ्यांची नावे (कंसात बदलीचे ठिकाण) ः सहायक पोलिस निरीक्षक - शाहूपुरीचे रविराज फडणीस (सांगली), शशिकांत सावंत (पुणे ग्रामीण), आरती नांद्रेकर (सातारा), सुशांत चव्हाण, मंगेश देसाई, सरोजिनी चव्हाण (2021 पर्यंत मुदतवाढ) देण्यात आली. दरम्यान सातारा येथील सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे, पुणे ग्रामीण येथील सागर पाटील, सांगलीचे उमेश दंडिले, सांगलीचे संजय क्षीरसागर यांची कोल्हापुरात बदली झाली. 

हेही वाचा- गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राची मागणी -

जिल्ह्यातील उपनिरीक्षकांमधील जुना राजवाड्याचे संजय नागरगोजेंची पुणे ग्रामीण, सचिन मद्वाना, अनिता मेणकर यांची सांगली, युवराज सुर्यवंशींची सोलापूर ग्रामीणला बदली झाली. 
तसेच सांगलीच्या सीमा बडे, सांगलीचे विष्णू माळी, प्रदीप चौधरी, पुणे ग्रामीणचे सोमनाथ वाघमोडे यांची कोल्हापुरात बदली झाली. वाहतूक शाखेचे शामराव देवणे यांना 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: transfer for Police Inspector Praveen Chougule, Navnath Ghogare