esakal | साहेब! पावती झाली की, दंड भरलाय, शहरातूनच जाणार! ; अवजड वाहनांमळे वाहतुक कोंडी

बोलून बातमी शोधा

transportation in city and deen a receipt of other punishment problem in ichalkaranji}

ओव्हरलोड व ओव्हरहाईट वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते आणि तीच कारवाईची पावती घेऊन ही वाहने शहरात प्रवेश करतात.

साहेब! पावती झाली की, दंड भरलाय, शहरातूनच जाणार! ; अवजड वाहनांमळे वाहतुक कोंडी
sakal_logo
By
ऋषिकेश राऊत

इचलकरंजी (कोल्हापूर) : अवजड वाहनांमुळे वाहतुकीच्या कोंडीत वाढ होतच आहे. आता वाहतुकीच्या एका नियमाने वाहतुकीला या अवजड वाहनांनी कोंडीत पकडले आहे. ओव्हरलोड व ओव्हरहाईट वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते आणि तीच कारवाईची पावती घेऊन ही वाहने शहरात प्रवेश करतात. या बेशिस्त चक्रव्युहाला भेदूनच रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन इतर वाहनांना जावे लागत आहे.

अवजड वाहनांची घुसखोरी आणि वाढत चाललेल्या वाहनांचा सर्वच रस्त्यांवरील अनिर्बंध वावर यामुळे शहरातील वाहतूक कोंडी चक्रव्यूहासारखी बनली आहे. नागरिकांना या वाहतुकीच्या चक्रव्यूहातूनच दररोजची कामे करावी लागत आहेत. मध्यवस्तीतील रस्त्यांवर पदोपदी असुरक्षितता वाढत चालली असून, पादचाऱ्यांना तर जीव मुठीत घेऊनच वावरावे लागत आहे. वाहतूक नियमांचा होत असलेला भंग वाहनधारकांनाही धोकादायक ठरत आहे.

हेही वाचा - इचलकरंजीत अवैध जुगार व्यवसायावर मोठी कारवाई ; बड्या लोकांची नावे? -

अवजड वाहनांची वाहतूक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असल्याने धोका निर्माण झाला आहे. अवजड वाहनांमध्ये भरलेला माल, उंची यांची स्थिती पाहिली तर इतर वाहने रस्त्यांवर चालवणे म्हणजे अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी जीवघेणी आहे. शहराला जोडणाऱ्या प्रत्येक मार्गावरून शहरात प्रवेश करणारी अवजड वाहने डोकेदुखीचा विषय बनला आहे.

प्रमुख मार्गावरून धावणाऱ्या ओव्हरलोड व ओव्हहाईटर वाहनांमुळे इतर वाहने खोळंबतात. सकाळी नऊ वाजल्यापासून ट्रॅफिक जाम सुरू होते. एका ठिकाणी दंडात्मक कारवाई होते आणि दिवसभर कारवाईची पावती घेऊन चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे धोक्‍याचे ठरू शकते. अशा वाहनांवर वेळोवेळीच निर्बंध आणून वाहतुकीचा आराखडा स्वच्छ करणे 
गरजेचे आहे.

साहेब....पावती झाली

ठिकठिकाणी वाहतूक शाखेचे पोलिस थांबलेले असतात. अशी वाहने शहरात प्रवेश करत असतील तर त्यांना अडवले जाते, मात्र वाहनचालक त्यादिवशी इतर ठिकाणी झालेली कारवाईची पावती दाखवतात. अनेक जण भरधाव वेगाने वाहन चालवत हात बाहेर काढतात आणि इशारा करून साहेब पावती झाल्याचे सांगतात.

"अवजड वाहनांवर एका ठिकाणी दंडात्मक कारवाई झाली की परत चोवीस तासांमध्ये त्यावर कारवाई करता येत नाही. हा तांत्रिक मुद्दा असला तरी विशिष्ट नियम आहेत. निश्‍चित केलेल्या कालावधीतच अवजड वाहनांना शहरात प्रवेश करता येतो."

- नंदकुमार मोरे, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा
 

हेही वाचा -  Video - कोरोना हाय का नाय? सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; डिजे लावून पालखी सोहळा -

संपादन - स्नेहल कदम