बेळगाव जिल्ह्यात 301 दुचाकी जप्त, न्यायालय सुरू झाल्यावर मिळणार दुचाकी...  

tree handred Two wheeler seized in Belgaum district
tree handred Two wheeler seized in Belgaum district

बेळगाव - संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. तरीही रस्त्यावर फिरणाऱ्यां युवकांची व नागरिकांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी अतिउत्साही लोकांवर कारवाई करण्यास सुरवात केली असून बेळगाव जिल्ह्यात 4 दिवसात 301 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुचाकीधारकांना आता न्यायालय सुरू झाल्यानंतरच दुचाकी परत मिळणार आहे. त्यामुळे संचारबंदी असतेवेळी काहीही कारण नसताना रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांनी विचार करणे आवश्यक बनले आहे. 

देशात कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता लॉकडाऊन जाहीर करीत लोकांना घरी राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तरीही अनेकजण रस्त्यावर फिरत आहेत.  सुरुवातीला रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला तर काही दुचाकीस्वारांना पोलिसांकडून फटक्यांचा प्रसाद मिळाला तरीही रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने पोलिसांनी दुचाकी जप्त करण्यास सुरुवात केली आहे. तसेच 4 दिवसात तब्बल 301 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून सोमवारीही सकाळपासून अनेक वाहनांवर कारवाई केली जात आहे. 

बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कारवाई गोकाकमध्ये करण्यात आली आहे तर त्यांनतर चिक्कोडी, अथणी, रायबाग, बैलहोंगल मध्ये दुचाकी जप्तीची कारवाई करण्यात आली असून बेळगाव व खानापूरमध्ये अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकूण 84 ठिकाणी चेकपोस्ट बनविण्यात आले असून लॉकडाऊनचे उल्लंघन केल्या प्रकरणी 41 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाउन पूर्णपणे करण्यात आला असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई केली जात असून गर्दीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले जात आहे. 

लक्ष्मण निंबरंगी - जिल्हा पोलीस प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com