कोल्हापूर ; कुरुंदवाडात भरारी पथकाची मोठी कारवाई 

Twenty lakh rupees Confiscated kolhapur kurundwad
Twenty lakh rupees Confiscated kolhapur kurundwad

कुरुंदवाड - येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात चार चाकी वाहनातून कर्नाटक राज्यातील एकसंबा येथे संशयास्पद 20 लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. रोख रक्कम, मारुती स्विफ्ट चार-चाकीसह सलीम अमीन सनदी, मुस्तफा मेहबूब सनदी, दावल हुसेन चौधरी, गणेश मारुती पवार(चौघे रा.मिरज,जि. सांगली)या चौघांना  ताब्यात घेतले आहे.


दरम्यान, शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड पोलिस ठाण्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात नाकाबंदी सुरू असताना कुरुंदवाड पोलिसांनी ही कारवाई केली. सलीम सनदी हा मिरजेचा मसाला व्यापारी असल्याचे सांगत असून पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. जप्त केलेली रक्कम पदवीधर शिक्षक निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथक प्रमुख फिरोज ऐतवडे हेमंत जाधव अजित कुरणे यांनी कोषागार कार्यालय शिरोळकडे जमा केली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी सुरू होती.आज सोमवारी रात्री साडेनऊ वाजता सुमारास सलीम सनदी आपल्या ताब्यातील मारुती स्विफ्टमधून (क्र. एम.एच 02बी.वाय860) कर्नाटक राज्यातील एकसंबाकडे जात असताना नाकाबंदी दरम्यान वाहनाची तपासणी केली असता, प्लास्टिकच्या निळ्या पोत्यात संशयास्पद 100 व 500 रुपयांच्या भारतीय चालनातील नोटांचे बंडल मिळून आले. पोलिस ठाण्यात या नोटांचे मोजमाप केले असता ते 20 लाख रुपये इतकी रक्कम असल्याचे निदर्शनास आले.

सलीम सनदी याची कसून चौकशी केली असता तो मिरज येथे मसाला व्यापारी आहे. हळदी व मसाले खरेदीसाठी एकसंबाकडे तो जात असल्याचे त्याने सांगितले. मात्र चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले असून सोबतच्या तिघांचीही चौकशी सुरु असून ही रक्कम शिरोळ तहसीलदार कार्यालयाचे निवडणूक भरारी पथकाकडे जमा करण्यात आली आहे.  


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com