Video - वयाच्या 50 व्या वर्षी स्टार्टअप ! दोन मैत्रिणींची अनोखी कहाणी... 

two friends Startup at 50 years of age in kolhapur
two friends Startup at 50 years of age in kolhapur
Updated on

कोल्हापूर : स्टार्टअपला वयाचे बंधन नसते, हे सांगणे सोपे आणि करणे अवघड आहे. मात्र, हेच अवघड वाटणारे स्टार्टअपचे काम दोन जिवलग मैत्रिणींनी करून दाखवले आहे. स्वतःचं स्वप्न मनाशी बाळगून त्यांनी वयाच्या ५० व्या वर्षी फूड व्हॅन सुरू केली आहे. याच व्हॅनद्वारे त्या स्वतःच्या पाककलेच्या कौशल्याचे रूपांतर व्यवसायात करत आहेत.

या दोन मैत्रिणी शालेय जीवनापासून एकत्र. दोघींनीही स्वतःच्या करिअरच्या वेगवेगळ्या वाटा निवडल्या. त्यातील एक क्रीडा शिक्षिका तर दुसरी ब्युटीशियन. संसाराचा गाडा चालवता चालवता त्यांनी काही स्वप्ने पाहिली. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी स्वतःच्या पाककलेला व्यावसायिक स्वरूप देण्याचे ठरवले. यातूनच त्यांनी ‘हेल्दी हाउस’ ही फूड व्हॅन सुरू केली. वंदना पाटील आणि सुनीता गुरव असे त्यांचे नाव. पाच वर्षांपासून त्यांनी स्वतःचा व्यवसाय असावा आणि त्यातही तो खाद्यसंस्कृतीशी निगडित असावा, असा निश्‍चय केला. त्यांच्या या प्रयत्नांना काही स्नेहींचे बळ मिळाले. अखेर सर्व काही ठरले आणि फूड व्हॅन अस्तित्वात आली. मात्र, सर्वांत मोठे संकट तर आता सुरू झाले होते. ही व्हॅन रस्त्यावर येणार इतक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. सर्व बंद झाले. 

उभारलेला व्यवसाय सुरू होण्यापूर्वीच थांबवावा लागला. मनाशी ठाम निश्‍चय केलेल्या या मैत्रिणींनी वाट पाहिली आणि आता ही व्हॅन परीख पुलानजीक उभी असते. येथेच या दोघी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत असतात. त्यांच्या या व्यवसायाला कुटुंबीयांचे आणि आप्तस्वकीयांचे मिळालेले पाठबळ हीच त्यांची ताकद असल्याचे त्या सांगतात. कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही वयात कोणतेही धाडस करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो, हेच या दोघींच्या यशातून दिसून येते.

प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतातच; मात्र या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. अनेक गोष्टींकडे लक्ष देत राहिल्यामुळे मुख्य गोष्टी बाजूलाच राहतात आणि हेच मान्य नाही. स्वप्न बघितलं आणि आता ते जगणार. 
- सुनीता गुरव

आपणच आपली जिद्द ठेवली पाहिजे. जिद्द ठेवली तरच आपण काहीतरी साध्य करू शकतो. मला हे करायचे आहे आणि मी हे करणारच, हा आत्मविश्वास आपल्याला विजेता बनवतो.
- वंदना पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com