दोन सराईत गुन्हेगार झाले इचलकरंजीत तोतया पोलिस

पंडित कोंडेकर
Monday, 28 September 2020

इचलकरंजी ः कर्नाटकातील दोन तोतया पोलिसांना शहापूर पोलिसांनी गजाआड केले. तारदाळ येथे एका घरात घुसून कर्नाटक पोलिस असल्याची बतावणी करीत घरझडती घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर दोघांनाही अटक करण्यात आली असून, ते कर्नाटक पोलिसांच्या रेकार्डवरील गुन्हेगार आहेत. 

इचलकरंजी, कोल्हापूर ः कर्नाटकातील दोन तोतया पोलिसांना शहापूर पोलिसांनी गजाआड केले. तारदाळ येथे एका घरात घुसून कर्नाटक पोलिस असल्याची बतावणी करीत घरझडती घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर दोघांनाही अटक करण्यात आली असून, ते कर्नाटक पोलिसांच्या रेकार्डवरील गुन्हेगार आहेत. 
मोहन सुरेश पवार (वय 20, रा. साखरवाडी, जाधव मळा, निपाणी) व प्रकाश मारुती कुंभार (40, रा. नाईंगलज, ता. चिक्कोडी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची तक्रार गोपाळ नामदेव पवार (30, रा. महेश सूतगिरणीसमोर, तारदाळ, ता. हातकणंगले) यांनी शहापूर पोलिसांत दिली आहे. 
दोन्ही संशयित कर्नाटक पोलिस असल्याचे भासवून तक्रारदार पवार यांच्या घरात घुसले. तुमच्याकडे चोरीचा माल असल्याचे सांगत घरझडती घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तक्रारदार पवार व त्यांच्या नातेवाईकांनी त्याला जोरदार विरोध केला. या वेळी संशयितांनी शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केली. या प्रकाराची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात दोघेही तोतया पोलिस असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर यापूर्वी अशाच प्रकारचा निपाणी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. शहापूर पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. हवालदार महेश कोरे अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two puppet policemen arrested in Ichalkaranji