शॉर्टसर्किटने दोन ट्रान्स्फॉर्मरला आग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

केर्ले पैकी मानेवाडी वीज उपकेंद्रात शॉर्ट सर्किटने आग लागून दोन ट्रान्स्फॉमर्र जळाले. भर उन्हात धुराचे लोट पाहून ग्रामस्थ भयभीत झाले.

पोर्ले तर्फ ठाणे : केर्लेपैकी मानेवाडी येथील महावितरणच्या उपकेंद्रातील 5 एम.व्ही.ए क्षमतेच्या दोन ट्रान्सफरला शॉर्टसर्किटमुळे आग लागून अंदाजे 60 लाखांचे नुकसान झाले. विजेचा दाब वाढल्यामुळे आग लागली असण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांने वर्तवली. कोल्हापूर येथील प्रतिभानगर आणि महारपालिका अग्निशामक दलाने आग आटोक्‍यात आणली.

केर्ले केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या 10 गांवाना आणि शेती पंपांना येथून वीज पुरवठा केला जातो. आज दुपारी एकच्या सुमारास अचानक दाब वाढल्यामुळे जंम्पने पेट घेतल्या. त्याच्या ठिणग्या ट्रान्सफार्मरवर पडल्याने ट्रान्सफर्मरने पेट घेतला. ट्रान्सफर्मरमधील असणाऱ्या ऑईलमुळे भडका उडाल्याने आगीचे आणि धुराचे लोट पसरले. प्रसंगावधान राखत ऑपरेटरने कोल्हापूर पालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. जवानांनी चार गाड्याच्या माध्यमातून आग आटोक्‍यात आणली. यात अंदाजे 60 लाखांचे नुकसान झाले.

दरम्यान घरगुती वीज सांयकाळपर्यंत सुरू करणार असून शेतीपंपाच्या विजेसाठी दोन दिवसांचा अवधी लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन बापट कॅम्पचे उपकार्यकारी अभियंता व्ही. व्ही. सपाटे आणि केर्ले सबस्टेशनचे कनिष्ट अभियंता रोहित भिरनाळे यांनी केले. दरम्यान ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. रानभरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two transformers fire with shorts circuit