uday samant said in press conference in kolhapur to shiv sena activist
uday samant said in press conference in kolhapur to shiv sena activist

आमचं ठरलंय, आता जिल्ह्यामध्ये एकच 'उद्धव गट' : उदय सामंत

Published on

कोल्हापूर : जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार करायचा असेल, तर आपली वज्रमूठ बनवली पाहिजे. यासाठी कोणत्याही गटबाजीला थारा देणार नाही. आजपासून जिल्ह्यात फक्त एकच गट असेल तो म्हणजे उद्धव गट, असा इशारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला. शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

मंत्री सामंत यांची कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून दोन दिवसापूर्वी निवड करण्यात आली. त्यानिमित्ताने आज त्यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. आपल्या सत्काराला उत्तर देताना सामंत म्हणाले, 'मी कोल्हापुरात शिकायला होतो. पक्ष निरीक्षक म्हणून मी कोल्हापुरात काम केले. इथल्या लोकांशी आणि मातीशी माझे वेगळेच ऋणानुबंध आहेत. शिवसेनेची ताकद कोल्हापुरात खूप आहे. मागच्या विधानसभेला येथून सहा आमदार होते. मात्र काही तात्कालिक राजकीय कारणांमुळे आता एकच आमदार आहे.'  

शिवसेनेचा विस्तार अधिक व्यापक करण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊन वज्रमूठ बनवावी लागेल. सत्ता आणि संघटना या माध्यमातून जनतेमध्ये शिवसेनेबद्दल विश्वास निर्माण करावा लागेल. म्हणूनच आता गटबाजीला थारा देणार नाही. आपण सगळे शिवसैनिक आहोत. आमचं ठरलंय आता जिल्ह्यामध्ये केवळ उद्धव गट असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. या पदाधिकारी मेळाव्याला जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com