esakal | गडहिंग्लजमधील स्पर्धेत युनायटेड विजेता, प्रॅक्‍टिस उपविजेता
sakal

बोलून बातमी शोधा

United team winners at Gadhinglaj Kolhapur Marathi News

स्थानिक नवज्योत क्‍लब तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. युनायटेडचा प्रथमेश धबाले स्पर्धावीर ठरला.

गडहिंग्लजमधील स्पर्धेत युनायटेड विजेता, प्रॅक्‍टिस उपविजेता

sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : चुरशीने झालेल्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन "अ' संघाने कोल्हापूरच्या प्रॅक्‍टिस क्‍लबला 2-1 असे नमवून विजेतेपदासह रोख 15 हजार रुपये आणि चषक पटकावला. स्थानिक नवज्योत क्‍लब तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. युनायटेडचा प्रथमेश धबाले स्पर्धावीर ठरला. नाईन साईड पद्धतीने गेले तीन दिवस एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू होती. 

सहायक पोलिस निरीक्षक शरद माळी, नगरसेवक दीपक कुराडे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. रश्‍मीराज देसाई, रवींद्र राठोड, अभिजित पाटील, नंदकुमार पाटील, अरविंद बारदेस्कर, मल्लिकार्जुन बेल्लद, सुनील चौगुले, महादेव पाटील, प्रशांत दड्डीकर उपस्थित होते. सचिव दीपक कुपन्नावर यांनी स्वागत केले. हुलपा सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. भूपेंद्र कोळी याने आभार मानले. समन्वयक प्रसन्ना प्रसादी, सौरभ जाधव, अभिजित चव्हाण आणि सहकाऱ्यांनी ही स्पर्धा यशस्वी केली. 

उपांत्य फेरीत प्रॅक्‍टिस फुटबॉल क्‍लबने युनायटेड ब संघाचा 4-1 असा सहज पराभव केला; तर युनायटेड संघाने नवज्योत फुटबॉल क्‍लबवर 2-0 अशी मात करून अंतिम फेरी गाठली होती. 

सर्वोत्कृष्ट खेळाडू 
गोलरक्षक : ओंकार सुतार (युनायटेड) 
बचावपटू : सुलतान शेख (युनायटेड) 
मध्यरक्षक : जय कामत (प्रॅक्‍टिस) 
आघाडीपटू : विकास जाधव (नवज्योत) 

संपादन - सचिन चराटी 

kolhapur