धरणाच्या अतिरिक्त पाण्याचा पॉवर हाउससाठी वापर 25 दशलक्ष युनिटची वीज निर्मिती

 Use of additional water from the dam for power house generates 25 million units of electricity
Use of additional water from the dam for power house generates 25 million units of electricity

कोल्हापूर,  ः जिल्ह्यात केवळ पुराच्या पाण्यासाठी केलेल्या नियोजनातून जलसंपदा विभागाने जून, जुलै दोन महिन्यांत तब्बल 25 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती केली आहे. एक टीएमसी पाण्यातून 20 लाख युनिट विजेची निर्मिती होते. हीच वीज सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांना विकली जाते. आज घरगुती वीज आठ रुपये युनिटने खरेदी केली जाते. अशी तब्बल 25 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती जलसंपदा विभागाने नियोजनातून केली आहे. ऐरवी हे पाणी केवळ नद्यांतून वाहून गेले असते. 
गतवर्षी कोल्हापुरात महापूर आला आणि येथून पुढे महापूर येऊ नये, हाहाकार होऊ नये, यासाठी जलसंपदा विभागाकडून नियोजन सुरू झाले. त्यामुळे धरणातील पाणी पातळीचे लक्ष्य ठरवून ऑगस्टपर्यंत पाणी पॉवर हाउसकडे वळविले. यामुळे राधानगरी, कुंभी, कासारी, कडवी, वारणा आणि दूधगंगा (काळम्मावाडी) या धरणांतून सुमारे आठ टीएमसी पाणी पॉवर हाउसला दिले गेले. जलसंपदा विभागाच्या उत्तर विभागातून हे पाणी सोडण्यात आले. तसेच कोल्हापूर दक्षिण विभागातील घटप्रभा, जंगमहट्टी, चित्री अशा तीनही धरणांतून सुमारे तीन टीएमसी पाणी पॉवर हाउसला सोडण्यात आले. दोन्ही विभागातून 16 आणि आठ अशा 24 दशलक्ष युनिट, तर इतर मिळून सुमारे 25 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती झाली आहे. या संपूर्ण विजेचे उत्पन्न कोट्यवधी रुपये असल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात आले. 

सुमारे 20 कोटींचे उत्पन्न 
जलसंपदा विभागाने जूनपासून धरणाच्या पाण्याचे नियोजन करून जलविद्युत केंद्रातून 25 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती केली. आठ रुपये युनिट दराने त्यातून सुमारे 20 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. जलसंपदा विभागाने महापुराचा धोका टाळण्यासाठी केलेल्या नियोजनामुळे पुराचे गंभीर संकट काही प्रमाणात कमी झाले. शिवाय वाया जाणाऱ्या पाण्यातून वीज निर्मितीद्वारे उत्पन्नही मिळाले. 


जून आणि जुलै महिन्यात जिल्ह्यात तब्बल 25 दशलक्ष नव्याने विजेची निर्मिती झाली आहे. पंचगंगा नदीने धोका पातळी गाठली असली तरीही केवळ जलसंपदा विभागाने केलेल्या पाण्याच्या नियोजनामुळे हाहाकार उडालेला नाही. तसेच, धरणांतील पाण्यामुळे विजेचे उत्पन्न वाढले आहे. जलसंपदा विभागाच्या नियोजनाचे यश आहे. 
 

संपादन ः यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com