esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

various vegetables newly grow in mountain area and help us to increase immunity power

पूर्वजांना या रानभाज्यांची सखोल माहिती होती, पण अलीकडच्या काळात मात्र या रानभाज्या अनेकांना माहित नाहीत

रोगप्रतिकारशक्ती वाढवायची ? तर 'या' रानभाज्या खावा !

sakal_logo
By
निवास मोटे

कोल्हापूर : जून जुलै महिन्यात दरवर्षी डोंगरपठार जंगलात तसेच शिवारात आपोआपच नैसर्गिक पद्धतीने रानभाज्या उगवतात. पूर्वजांना या रानभाज्यांची सखोल माहिती होती, पण अलीकडच्या काळात मात्र या रानभाज्या अनेकांना माहित नाहीत. दोन वर्षांपासुन रानभाज्यांची ओळख कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेने करून दिली आणि या रानभाज्या महत्व आले.सध्या तर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातल्यामुळे या औषधी रानभाज्यांना आता मोठे महत्त्व आले आणि भाजींच्या चव चाखण्यासाठी आता डोंगर पठारावर गर्दी होऊ लागली आहे.

हेही वाचा - आयटीआयला प्रवेश घेतलाय ? तुमच्या प्रवेशाची यादी जाहीर होणार या दिवशी

ज्योतिबा डोंगर पोहाळे तर्फ आळते कुशिरे तर्फ ठाणे गिरोली दाणेवाडी  या पन्हाळा तालुक्याच्या डोंगर पठार भागातील आणि शिवारामध्ये पंचवीसहुन अधिक प्रकारच्या रानभाज्या सापडतात. या भागातील शेतकरी ग्रामस्थ त्यांच्याकडे तण म्हणून पहात होते. त्यांना काढून फेकत होते. कित्येक वर्षांपासून या भाज्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होते पण पण दोन-तीन वर्षापासून ग्रामस्थांनी या भाज्यांची ओळख  करून घेतली आहे.   आरोग्य उत्तम रहावे यासाठी सध्या ग्रामस्थ आहारात या रानभाज्याचा वापर करू लागले आहेत. 

या भागात भारंगी, मोरशेंड, गुळवेल, टाकाळा, पाथरी, तेरडा, केना, घोळी, अंबुशी, आघाडा, हादगा, कुर्डू, काटेमाठ, रानमोहर, फांजिरा, या प्रकारच्या 25 हून अधिक भाज्या सापडतात. कोल्हापुरातील काही निसर्गप्रेमी व भाज्यांची ओळख असणारे काही पर्यटक दर रविवारी किंवा सुट्टीदिवशी या डोंगर पठाराला भेट देऊन या रानभाज्या घेऊन जातात . दरम्यान ,
शेती किंवा निगा न करता नैसर्गिकरित्या उगवलेल्या भाज्यांना रान भाज्या असे म्हणतात. 

मुख्य करून या भाज्या जंगल डोंगर-पठार शेतातील बांध किंवा माळरानाच्या परिसरात सापडतात. या भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असून त्या आहारात भाजी करून खातात. पूर्वीपासून आदिवासी बांधव या भाज्यांचा आहारात वापर करताना दिसत आहेत. शहरात या भाज्यांचा फारसा संबंध येत नाही परंतु ग्रामीण भागातील डोंगर पठारावर या भाज्या सर्रास सापडतात. सध्या या डोंगर पठारावर रान भाज्यांच्या शोधासाठी निसर्गमित्र, शेतकरी, तरूण वर्ग फिरू लागले आहेत. 

हेही वाचा -  अठरा तास ड्यूटीरुन यंदा खाकीला मिळाली थोडीशी उसंत..

दोन तीन वर्षापूर्वी निसर्ग मित्र संस्थेचे अनिल चौगुले यांनी आमच्या भागातील रान भाज्यांची माहिती दिली . तेव्हापासून आम्ही या रान भाज्या खाऊ लागलो. सध्या कोरोना संसर्गामुळे तर या रान भाज्याचे महत्व वाढले आहे.

"पोहाळे गिरोली जोतिबा परिसरात रानभाज्यांचा खजिना आहे. या रानभाज्या आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त असून त्या औषधी गुणधर्माच्या आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी या रानभाज्यांचा वापर आपल्या रोजच्या आहारात करावा. आपल्या भागातील रानभाज्यांचा खजीना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारी घ्यावी."

- अनिल चौगुले, निसर्ग मित्र संस्था कोल्हापूर 

संपादन - स्नेहल कदम 

go to top