येथे माकडे फोडतात वाहनांचे आरसे  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vehicle mirrors burst with monkeys

महागोंड (ता. आजरा) येथे सात ते आठ माकडांचा कळप दाखल झाला आहे. या माकडांनी वाहनांचे आरसे लक्ष्य केले आहेत. गेल्या आठ दिवसापासून हा त्रास सुरू आहे.

येथे माकडे फोडतात वाहनांचे आरसे 

उत्तूर (कोल्हापूर) : महागोंड (ता. आजरा) येथे सात ते आठ माकडांचा कळप दाखल झाला आहे. या माकडांनी वाहनांचे आरसे लक्ष्य केले आहेत. गेल्या आठ दिवसापासून हा त्रास सुरू आहे. याबाबत वनखात्याला माहिती देण्यात आली आहे. माकडे नारळ, केळी, फळभाज्यांच्या नुकसानीबरोबरच आता थेट घरात इतर वस्तूंची नासधूस करीत असल्याने ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. 

हे पण वाचा - कोकण रेल्वेच्या समोर बिबट्या आला अन्...

माकडांनी काही दिवसापासून येथे उच्छाद मांडला आहे. नारळ, केळी तसेच फळभाज्यांची नासधूस केली. माकडांना हाकलविण्यासाठी येथील ग्रामस्थाने अतोनात प्रयत्न केले, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न असफल ठरले. हुसकविल्यांवर माकडे अंगावर धावून येत आहेत. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. 
सायंकाळच्या वेळी गावाजवळील जंगलातून हा कळप येतो. बसस्थानकावरील मोबाईल टॉवरवर माकडे चढून बसतात. परिसरात एखादे चारचाकी किंवा दुचाकी वाहन दिसले की, टॉवरवरून खाली येवून गाडीचे आरसे मोडून किंवा फोडून टाकतात. या प्रकारामुळे वाहनधारक वैतागले आहेत. त्याना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याशिवाय गावातील झाडांची नासदुस करणे, कौले फोडणे असे प्रकारही सुरू आहेत. 

हे पण वाचा - नाणार रिफायनरी समर्थकांना शिवसेनेचा हा सवाल

गावातील वाहनांचे आरसे माकडांनी लक्ष्य बनवले आहेत. यामुळे वनखात्याने माकडांचा बंदोबस्त करावा. 
- धीरज पाटील, महागोंड, ग्रामस्थ 

सरपंचांनी वनविभागाला कळवले आहे. माकडांना पकडण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी मागितली आहे. माकडे पकडणाऱ्या व्यक्तीबरोबर संपर्क करून लवकरच महागोंडमध्ये माकडे पकडण्याची मोहीम राबवू. पकडलेली माकडे दुरच्या जंगलात सोडण्यात येतील. 
- नागेश खोराटे, वनरक्षक 

Web Title: Vehicle Mirrors Burst Monkeys

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur