दिंडी चालली हो..!, माघवारीसाठी वारकऱ्यांनी धरली पंढरपूरची वाट

vestryish going to pandharpur for festival of magh vari from kolhapurvestryish going to pandharpur for festival of magh vari from kolhapur
vestryish going to pandharpur for festival of magh vari from kolhapurvestryish going to pandharpur for festival of magh vari from kolhapur
Updated on: 

कसबा तारळे (कोल्हापूर) : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा तब्बल वर्षभराचा फटका सोसलेल्या व परिणामी आषाढी वारीसाठी बाहेर न पडू शकलेल्या ग्रामीण भागातील वारकऱ्यांच्या दिंड्यांनी आता माघ वारीच्या निमित्ताने पंढरपूरची वाट धरली आहे. दिंडीतील सहभागी वारकऱ्यांची संख्या दरवर्षीच्या तुलनेत कमी असली तरीही नित्यनेमाने मजल दर मजल करीत या दिंड्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रासह धार्मिक क्षेत्रावरही परिणाम झाला होता. गावोगावची मंदिरे कुलूपबंद होती. गेल्या दोन महिन्यांपासून मंदिरे उघडली आणि धार्मिक क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले. आळंदी ते पंढरपूर अशा आषाढी वारीला कोरोनामुळे मुकलेल्या वारकऱ्यांनी माघवारी मात्र चुकवायची नाही या इराद्याने पंढरीची वाट धरली आहे. पंढरपूर येथील स्थानिक प्रशासनाने एकादशी व द्वादशी निमित्ताने होणारी गर्दी टाळण्याच्या हेतूने वारकऱ्यांना वारी निमित्ताने पंढरीत हे दोन दिवस सोडून यावे, असे आवाहन केले आहे. 

परिणामी गावागावांतून दरवर्षी जाणारे भाविक पंढरपुरात माघ वारीच्या निमित्ताने अधेमधे जाऊन दर्शन घेऊन आपापल्या गावी परतू लागले आहेत. परंतु जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या दिंड्यांनी मात्र नित्यनेमाप्रमाणे सात-आठ दिवसांच्या पायी प्रवासासाठी प्रस्थान ठेवले आहे. रविवारी (ता.१४) सायंकाळी जिल्हाभरातील या दिंड्या कोल्हापुरातील मार्केट यार्ड येथील श्री. विठ्ठल मंदिर परिसरात एकत्र जमतील व तेथून दिंड्यांचा सोहळा पायी प्रवासानिमित्ताने सोमवारपासून पुढे पंढरपूरच्या दिशेने रवाना होईल.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com