जो डर गया समझो बच गया... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर व्हिडीओची धमाल...

संदिप खांडेकर
गुरुवार, 26 मार्च 2020

अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाईड कोल्हापूरतर्फे 'शोले' चित्रपटातील खलनायक अमजद खान यांचा डायलॉग वेगळ्या पद्धतीने तयार करून फॉरवर्ड केला जात आहे.

कोल्हापूर - जो डर गया समझो बच गया, आ गये मेरी मौत का तमाशा देखने, यासह घरातील एकांतवासाने  कंटाळलेल्या लोकांवर‌‌ आधारीत केलेले टीक-टॉकचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच घुमू लागले आहेत. कोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपलातुन पद्धतीने मेसेज व व्हिडिओ तयार करण्यात आले असून, त्यातून नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात संचारबंदी लागू करून नागरिकांना एकवीस दिवस घरात बसण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे तातडीचे पाऊल उचलले असले तरी नागरिकांत अजून त्याचे गांभीर्य दिसत नाही. रस्त्यांवर थोड्या प्रमाणात का होईना नागरिक फिरताना दिसत आहेत. विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी-चारचाकीधारकांवर दंडात्मक कारवाई पोलिसांकडून केली जात आहे. तरीही लोकांच्या वर्तणुकीत फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे नागरिकांचे प्रबोधन विविध मार्गांनी केले जात आहे. 

वाचा - कोल्हापुरकर टेन्शन नॉट ; आता तुम्हाला मिळणार अंडी, चिकण, मटण...  

त्याचाच एक भाग म्हणून अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाईड कोल्हापूरतर्फे 'शोले' चित्रपटातील खलनायक अमजद खान यांचा डायलॉग वेगळ्या पद्धतीने तयार करून फॉरवर्ड केला जात आहे. 'जो डर गया समझो मर गया,' याऐवजी 'जो‌ डर गया समझो बच गया', हा मेसेज व्हाट्सअॅप, फेसबुकद्वारे पाठवला जात आहे. 'क्रांतिवीर' चित्रपटातील नाना पाटेकर यांचा डायलॉग खूपच फेमस आहे. त्यामध्ये थोडासा बदल करून कोरोनाचे गांभीर्य कळावे यासाठी त्यात बदल केला आहे. हा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.

घरात कंटाळलेल्या तरुण-तरुणींचे व्हिडीओ टीक-टाॅकद्वारे शेअर केले जात आहेत. 'घरात बसायचा कंटाळा आलाय तर एक काम करा.. शेताला पाणी पाजा,' असे मेसेजसह घरातच ट्रेकिंग घरातील भिंतीवर क्लायबिंग करणारे व्हिडिओ फेसबुकवर पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे विनंती करणारी मेसेज व व्हिडिओ आवर्जून शेअर केले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video of against Corona viral on social media