तिघा ट्रॅक्टर चोरट्यांना अटक

लुमाकात नलवडे
Tuesday, 20 October 2020

इस्पुर्लीतील दोन ट्रॅक्‍टरचोरी प्रकरणी आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली. नीलेश बाजीराव पाटील (वय 32 वाकरे, ता. करवीर), सतीश विठ्ठल पाटील (25), मनोज विठ्ठल पाटील (दोघेही रा. केंबळी, ता. कागल) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे नऊ लाख 72 हजार रुपयांचे दोन ट्रॅक्‍टर-ट्रॉली जप्त केल्या. वाकरेपैकी पोवारवाडी (ता. करवीर) येथे ही कारवाई केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.

कोल्हापूर ः इस्पुर्लीतील दोन ट्रॅक्‍टरचोरी प्रकरणी आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली. नीलेश बाजीराव पाटील (वय 32 वाकरे, ता. करवीर), सतीश विठ्ठल पाटील (25), मनोज विठ्ठल पाटील (दोघेही रा. केंबळी, ता. कागल) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे नऊ लाख 72 हजार रुपयांचे दोन ट्रॅक्‍टर-ट्रॉली जप्त केल्या. वाकरेपैकी पोवारवाडी (ता. करवीर) येथे ही कारवाई केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.

ट्रॅक्‍टर-ट्रॉली चोरीचा गुन्हा इस्पुर्ली पोलिसांत दाखल झाला होता. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिसांच्या बैठकीत चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक तानाजी सावंत यांनी पोलिस निरीक्षक संतोष पवार यांचे पथक तयार केले. यामध्ये सहाय्यक फौजदार इकबाल महात, सचिन देसाई, सुरेश पाटील, असिफ कलायगार यांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी वाकरे पैकी पोवारवाडी येथे नीलेश पाटील याच्या वीटभट्टीवर चौकशी केली. तेथे दोन्ही ट्रॅक्‍टर-ट्रॉली दिसून आल्या. चौकशी केल्यानंतर त्या चोरीच्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पथकाने वीटभट्टीमालक नीलेश पाटील, सतीश पाटील व मनोज पाटील यांना अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील ट्रॅक्‍टर व चोरीच्या ट्रॉली असे सुमारे 9 लाख 72 हजार रुपये किंमतीची वाहने जप्त केल्याचे निरीक्षक सावंत यांनी सांगितले.

संपादन ः रंगराव हिर्डेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IN villege Wakre Three thives arrested