आभासी वागण्याला भुलनं ठरते घातक.. 

Virtual behavior can be dangerous.
Virtual behavior can be dangerous.

कोल्हापूर :  तो चारचाकी गाडी घेऊन तिच्या मागावर असायचा, चांगले कपडे, स्टायलीश वागण्यातून त्याने तिच्याशी संवाद वाढविला, असा रुबाबदार, श्रीमंत मित्र तिलाही "जवळ'चा वाटू लागला. त्यांचं जमलं, कांही दिवसात तिला समजले चारचाकी त्याची नाही, त्याचे वडील फेरीवाले आहेत, आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, याची माहिती तिला मिळताच त्याच्या आभासी जगण्यातील फोलपणाचा तिला झटका बसला, तिने त्याचा नाद सोडला आणि तो निराशेत गेला. 


ती भेटत नाही म्हणून त्या नाराज गड्याने, मोकळे बोलणं सोडलं, एकाकी वावरू लागला. घरात अबोलच राहू लागला. पुढे पुढे मोबाईलमध्ये गुंतत गेला, मोबाईलच त्याचा मित्र झाला. ना धड हसतो ना धड बोलतो. त्याचा हा एकाकीपणा इतका वाढला की अखेर त्याला सीपीआरच्या मानसोपचार कक्षात दाखल करावे लागले. 

त्याची समजूत काढण्यापूर्वी नेमके प्रकरण काय? याची माहिती इथल्या तज्ज्ञानी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा मुलाला या निराशेतून बाहेर पडता आले नाही तर तो तीव्र निराशेत जावू शकतो, त्याच जगणंच उद्धवस्त होऊ शकते, याचा अंदाज घेतला. त्या मुलाला या प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. कधी काळी अशा घटनांतून बदला, सुडाची भावनाही तयार होऊ शकते, ही बाब गृहीत धरून त्या दोघांनाही एकमेकांची जीवनशैली वेगळी आहे, हे समजून सांगणे गरजेचे होते. तेव्हा समुपदेशकांनी प्रयत्नांशी शिकस्त करत पहिल्यांदा त्या मुलाची मानसिक स्थिती पूर्ववत करण्यासाठी समपुदेशन केले. त्यानंतर त्या मुलीचाही शोध घेऊन तिलाही चार समजूतीच्या शास्त्रीय गोष्टी सांगितल्या. दोघांनाही एकमेकांविषयीचे समज, गैरसमज, राग, व्देष दूर करून नियमितपणे आपापल्या मार्गाने जाण्याचे करीयर करण्याचा मार्ग दाखवला. 

हा प्रसंग वरवर साधा जरूर वाटेल मात्र अशा आभासी वागण्याला भुलून कधी मुली तर कधी मुले वाट चुकतात, एकामेकांना जवळ करतात. नंतर खरे वास्तव काय आहे, याची माहिती मिळाली की, त्रागा करतात. 

अशावेळी त्यांचे मानसिक स्वास्थ बिघडू शकते. पालकांनी पाल्याशी मैत्रीचे नाते ठेवावे. भावभावना, त्यांच्या हालचाली वेळीच ओळखल्या पाहिजेत. लहानपणापासूनच नकार स्विकारण्याची मानसिकता तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सीपीआरच्या मानसोपचार विभागातील माहेश्‍वरी पुजारी यांनी "सकाळ' शी बोलताना सांगितले. 

लहानपणापासून मुलामुलींत नकार स्विकारण्याची क्षमता निर्माण करावी. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडेल असे नाही. आयुष्यात मनासारख्या घटना नेहमीच घडणार नाहीत. त्या घडल्या नाहीत तर त्या गोष्टीतून सावरून करिअर आणि सकारात्मक आयुष्याकडे वाटचालीसाठी मुलांना पालकांनी तयार केले पाहिजे. 
- डॉ. पवन खोत, विभागप्रमुख, मानसोपचार विभाग, सीपीआर 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com