
कोल्हापूर - सार्वजनिक प्रवासी सेवा देणाऱ्या एसटी महामंडळात 50 वर्षावरील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी स्वेच्छा निवृत्ती योजना आणली आहे. तसे पत्र सर्व विभाग नियंत्रकांना पाठवण्यात आले आहे. त्याची माहिती अधिकारी, कर्मचारी यांना सांगून स्वेच्छा निवृत्तीला प्रोत्साहन देण्याचे काम एसटी प्रशासनाकडून सुरू आहे.
गेल्या पाच सहा वर्षाहून अधिक काळ एसटी महामंडळाला तोट्यात चालेले आहे. अशात गेल्या सात महिन्यात कोरोना लॉकडाऊन होता. याकाळातही प्रवासी वाहतूक बंद होती. रोज बारा कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे एसटीचे मोठे अर्थिक नुकसान झाले. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी पैसे नाहीत. राज्य शासनाने केलेल्या 250 कोटीच्या मदतीतून वेतन द्यावे लागले. यापुढील काळात एसटीची अर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी खर्चात काटकसर व महसुल वाढविण्याच्या उपाय योजना राबविल्या जात आहेत.
त्याच्याच पुढील भाग म्हणून 50 वर्षावरील अधिकारी, कर्मचारी वर्गासाठी स्वेच्छा निवृत्तीची योजना आणली आहे. राज्यभरात जवळपास एक लाख 5 हजार कर्मचारी काम करतात. यातील जवळपास 36 टक्के कर्मचारी 50 वर्षावरील आहेत. यात ज्यांचे वय येत्या 30 जून 2020 पर्यंत 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांना या योजनेनुसार स्वेच्छा निवृत्ती घेता येणार आहे.
हे पण वाचा - आणि हसन मुश्रीफ झाले भाऊक
निवृत्ती योजनेबाबत महाराष्ट्र एसटी वकर्स कॉंग्रेस (इंटक) ने विरोध केला आहे. राज्याध्यक्ष मुकेश तिगोटे म्हणाले की, "" एसटी कर्मचारी उतारवयात बेरोजगार होणार आहेत. त्यांच्यावर उपासमारीच वेळ येऊ शकते. निवृत्तीनंतर केवळ तीन महिन्याचे वेतन उपदान म्हणून मिळेल तर पेन्शन स्वरूपात देण्यात येणारी रक्कम तीन हजार रूपयांच्यावर मिळणे मुश्कील आहे. कर्मचाऱ्यांच्या उतारवयाचा विचार घेऊन किमान दर वर्षाला आठ महिन्यांचे वेतन मिळावे तसेच वारसांना नोकरीत घ्यावे, त्याशिवाय कर्मचारी या योजनेला प्रतिसाद देणार नाहीत.''
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.