पोषण आहारातील स्वयंपाकी मानधनाच्या प्रतीक्षेत

Waiting For The School Nutrition Diet Cook's Salary Kolhapur Marathi News
Waiting For The School Nutrition Diet Cook's Salary Kolhapur Marathi News

इचलकरंजी : शालेय पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न पुन्हा निर्माण झाला आहे. मानधनाचा आधार असलेल्या महिलांचे नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिन्यांचे मानधन खोळंबले आहेत. हातकणंगले तालुक्‍यातील स्वयंपाक व मदतनीस प्रतिमहिना 1 हजार 500 प्रमाणे 10 लाख 56 हजार मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ दप्तर दिरंगाईमुळे मानधन खोळंबळत असल्याचे चित्र प्रत्येक महिन्याला दिसून येते. 

शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला कामगारांचे मानधन गेल्या तीन महिन्यांपासून अडकून पडले आहे. स्वयंपाकी आणि मदतनीस महिलांना मासिक 1 हजार 500 रुपयांचे मानधन मिळते. मात्र हे मानधन कधीच वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. या रोजगाराच्या मानधनाचा महिलांना खूप मोठा आधार असतो. हे मानधन प्रत्येक महिन्याला शासनाकडून महिला कामगारांच्या थेट खात्यावर जमा केले जाते.

जिल्हास्तरावरून मानधन अदा करण्यासाठी वेळापत्रक तयार करून घेण्यात आले आहे. संबंधित केंद्रप्रमुखांनी दरमहा तीन तारखेपर्यंत मानधनाचे तालुका कार्यालयात सादर करणे आवश्‍यक असते. तालुका कार्यालयाकडून देयकांची तपासणी करून एकत्रित देयके जिल्हा परिषदेकडे बॅंक यादीसह सादर करण्यासाठी पाच तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र हे नियोजन प्रत्येक महिन्याला कोलमडते. परिणामी महिलांचे मानधन वेळेवर मिळत नाही. 

कोरोनाच्या शाळा बंद काळात स्वयंपाक व मदतनीस महिला पोषण आहार वाटपाचे काम करत होत्या. कामात खंड नसुनदेखील या महिलांना वेळोवेळी मानधनाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. आता चक्क तीन महिन्यांच्या मानधनासाठी स्वयंपाकी व मदतनीस महिलांना प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रत्येक वेळी मानधनाबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण संचालनाययाशी संपर्क साधल्यानंतर तोडगा निघतो. मात्र सुयोग्य नियोजनाने मानधनाचे प्रक्रिया सुलभ होणे गरजेचे आहे. 

अन्य तालुक्‍यांचा फटका 
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातील मानधनाची देयके दिलेल्या तारखेपर्यंत जिल्हा परिषदेकडे येत नाहीत. प्रत्येक महिन्याला महिन्याला काही तालुके मागे राहतात. त्यामुळे याचा फटका स्वयंपाकी व मदतनीस यांच्या प्रत्येक महिन्याच्या मानधनाचा बसतो आणि प्रत्येक महिन्याला हे मतदान वेळेवर मिळत नाही. 

हातकणंगलेतील थकीत मानधन स्थिती (नोव्हेंबर ते जानेवारी) 
शाळा - 280 
स्वयंपाक व मदतनीस - 704 
एकूण मानधन - 31 लाख 68 हजार 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com