पाणी बाजारपेठेत शिरले अन्‌ आठवणी पुन्हा जाग्या झाल्या... "या' गावात अंधारातच काढला व्यापाऱ्यांनी माल बाहेर

Water Entered The Kowad Market And Memories Reawakened... Kolhapur Marathi News
Water Entered The Kowad Market And Memories Reawakened... Kolhapur Marathi News

कोवाड : मंगळवारी मध्यरात्री पूराचे पाणी कोवाड बाजारपेठेत शिरल्याने नदीकाठच्या व्यापाऱ्यांची झोपच उडाली. रात्रीच्या अंधारातच नदीकाठच्या काही व्यापाऱ्यांनी दुकानातील माल बाहेर काढून निःश्‍वास सोडला. गेल्यावर्षीच्या पुराच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्याने धडकी भरली. 

गेल्या वर्षी अचानक रात्री पूराचे पाणी बाजारपेठेत आल्याने शेकडो दुकाने पाण्यात बुडाली. व्यापारी वर्गाचे कोट्यावधीचे नुकसान झाले. तब्बल सहा दिवस पाणी राहिल्याने दुकानाच्या फर्निचरसह मालाचे नुकसान झाले होते. नदीकाठची काही घरे जमीनदोस्त झाली होती. त्यामुळे यावर्षी पूराच्या पाण्याकडे सर्वांचे डोळे लागले होते.

मंगळवारी मध्यरात्री नदीचे पाणी पाठीमागच्या बाजूने काही दुकानातूनही गेले. त्यामुळे तीस ते चाळीस व्यापाऱ्यांनी रात्री तीन वाजलेपासून दुकानातून माल बाहेर काढण्याला सुरवात केली. माल सुरक्षित बाहेर काढण्यासाठी दुकानदारांची रात्रीच धडपड सुरु झाली. नदीकाठच्या लोकानी घरेही खाली केली. पहाटे बाजारपेठेत पाणी शिरले. त्यामुळे इतरही व्यापाऱ्यांनी दुकानातून माल बाहेर काढण्याचे काम सुरू केले. पावसाची रिपरीप सुरूच होती. अनेक सामाजिक कार्यकर्त्यानी दुकानदारांना मदतीचा हात दिला होता.

दिवसभर बाजारपेठेत दुकानातून माल बाहेर काढण्यासाठी धांदल उडाली होती. दुंडगे रोड व निट्टर रोडवर पाणी आल्याने व्यापाऱ्यांनी अधिकच धास्ती घेतली. वाढत्या पाण्याचा अंदाज घेऊन जवळपास सर्वच व्यापाऱ्यांनी खबरदारी घेतली. ट्रक, टेंम्पो व ट्रक्‍टरमधून माल नेवून सुरक्षित स्थळी ठेवत होते. निट्टूर रोडच्या खालील व नवीन पुलाच्या समोरील डाव्या बाजूच्या सर्व दुकानातून पाणी गेल्याने सर्वच व्यापाऱ्यांनी दुकानातून माल बाहेर काढून खबरदारी घेतली. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com