सोन्या बरोबर आता चांदी दरात घसरण...जाणून घ्या दर

Weekly silver prices fall  in hupari kolhapur martahi news
Weekly silver prices fall in hupari kolhapur martahi news

हुपरी (कोल्हापूर) : कोरोना आणि जागतिक बाजारपेठेत घडत असलेल्या घडामोडींचा सोने-चांदीच्या दरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ लागला आहे. गत आठवड्यात चांदी दरात तब्बल १२ हजार रुपयांची घसरण झाली. ती ३६ हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे. गेल्या आठवड्यात दर ४७ हजार ५०० होता. चांदी दरातील प्रचंड उतारामुळे हुपरी परिसरातील चांदी व्यावसायिकांत चिंता व्यक्त होत असली, तरी दरातील घसरण ही कृत्रिम असून. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर सोने-चांदी दरात वाढ होणे अपेक्षित असल्याचे मत जाणकारांत व्यक्त होत आहे. 

चांदी दरात १२ हजारांची घसरण

परिसरात चांदीचे दागिने निर्मिती मोठ्या प्रमाणात चालते. या व्यवसायावर पंचक्रोशीतील हजारो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. काल (ता. १६) एका दिवसात चांदी दर पाच हजार आणि आठवड्यात तब्बल १२ हजार रुपयांनी घसरला आहे.त्यामुळे पंचक्रोशीतील चांदी उद्योगासह इतर व्यवसाय ठप्प झाला आहे. परिसरातील बाजारातील उलाढाल चांदी दरावर अवलंबून असते. दागिने निर्मिती करणारा धडी उत्पादक हा या उद्योगातील प्रमुख घटक. हा धडी उत्पादक व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या वेस्टेजच्या (तूट) बदल्यात आपल्या गरजा भागवत असतो. भाव आज ३६ हजारांवर आला आहे. त्यामुळे धडी उत्पादकांसह, व्यावसायिकांना मोठा तोटा झाला आहे.

कोरोनाचा जागतिक बाजारपेठेतील परिणाम​

चांदी दरातील गणितावर मोठी खरेदी, व्यवसाय, घर, वाहन आणि इतर कारणांसाठी कर्ज घेतलेल्यांचेही धाबे दणाणले आहेत. एकीकडे हुपरीतील काही बॅंका चांदी व्यवसायाला कर्ज द्यायला तयार नाहीत. दरातील घसरण कधी थांबणार याची शाश्वती नाही. अशा स्थितीत आर्थिक नाड्या आकसल्या गेल्याने चांदी व्यवसायिकांसमोरील डोकेदुखी वाढली आहे. पंधरा दिवसापूर्वी सोन्या चांदीचे भावातील रोजची चढ उतार नैसर्गिक होती. वायदे बाजारात 
नफेखोर कृत्रीम चढ उतार करून नफा वसुली करीत होते.

 म्हणून सोने चांदी दरांत घसरण सुरू

लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे मागणी घटून दर उतरण्याची कोणतीही संभावना नव्हती. पण अचानक पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले. साहजिकच जगभरातील आयात निर्यात थंडावली. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजाराबरोबर स्थानिक बाजारावर जाणवू लागला. वायदे बाजारात कागदोपत्री उलाढाल करणाऱ्यांकडून सोन्या चांदीचे दर पडणार या भीतीने आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरवात झाली. त्यामुळे सोने चांदी दरांत घसरण सुरू आहे.

परत दर वाढणार

चांदी दरातील घसरण ही सामान्यांसाठी इष्टापत्ती आहे. भविष्यकालीन फायद्यासाठी सोने-चांदीमध्ये गुंतवणुकीची उत्तम संधी आहे. दरातील ही घसरण कृत्रिम व तात्पुरती असून, कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा कमी होईल तसे दर परत वाढत जाणार आहेत.  
- मोहन खोत, चांदी व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com